पांडुरंगापेक्षा PM मोदींचा फोटो मोठा : भाजपच्या वरिष्ठांकडून वादग्रस्त बॅनर हटवण्याचे आदेश

BJP | Pimpari Chinchwad | भाजप आमदार महेश लांडगे यांचे समर्थक निलेश बोराटे यांनी हे बॅनर्स लावले आहेत.
पांडुरंगापेक्षा PM मोदींचा फोटो मोठा : भाजपच्या वरिष्ठांकडून वादग्रस्त बॅनर हटवण्याचे आदेश
Pimpari Chinchwad | Narendra Modi Sarkarnama

पिंपरी-चिंचवड : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) येत्या १४ जुन रोजी देहू दौऱ्यावर येणार आहेत. या वेळी ते देहू इथल्या जगदगुरू श्री संत तुकाराम महाराज मंदिराला भेट देणार असून तिथल्या शिळा मंदिराचं लोकार्पण करणार आहेत. मात्र त्यापूर्वीच पंतप्रधान मोदी यांचा दौरा भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांमुळे वादात सापडला आहे. मोदींच्या स्वागतासाठी लावलेले स्वागत पोस्टर्सवरुन वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या असल्याचे म्हटले जात आहे. (PM Narendra Modi Latets News)

पंतप्रधान नरेंद्र मोदी मंगळवार १४ जुन रोजी देहू नगरीत दाखल होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर त्यांच्या स्वागतासाठी पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरात अनेक छोटे बॅनर्स आणि होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. भाजप आमदार महेश लांडगे यांचे समर्थक निलेश बोराटे यांनीही पंतप्रधान मोदी यांच्या स्वागतासाठी पिंपरी चिंचवडमधील मोशी इथल्या भारतमाता चौकात मोठे बॅनर लावले आहे. मात्र या बॅनरवर पंतप्रधान मोदींचा फोटो विठ्ठलाच्या फोटोपेक्षा मोठा असल्याचं दिसून येत आहे. यामुळे वारकऱ्यांच्या भावना दुखावल्या असल्याचे म्हटले जात आहे.

यावरुनच राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी टीका करत वारकरी सांप्रदायाचा अवमान केल्याची भावना व्यक्त केली आहे. आपल्या ट्वीटमध्ये वरपे म्हणतात, "संत ज्ञानेश्वर महाराजांनी वारकरी संप्रदायाचा पाया रचून संत तुकाराम महाराजांनी यावर कळस चढविला.पिं-चिंचवड येथे भाजपाने जाणीवपूर्वक मोदींचा फोटो पांडुरंगापेक्षा जाणीवपूर्वक मोठा दाखवून संप्रदायाचा अवमान केला आहे. विटेवरी उभा बा विठ्ठलापेक्षा मोठा कोणी नाही. पिंपरी चिंचवड शहर भाजपाने मोदींना विठ्ठलापेक्षाही मोठे दाखवण्याचे पाप केले आहे. वारकरी संप्रदायाची बदनामी वारकरी संप्रदाय खपवून घेणार नाही. याबद्दल भाजपाने पांडुरंगापुढे लोटांगण घालून माफी मागावी, अशीही मागणी त्यांनी केली आहे. (PM Narendra Modi Latets News)

दरम्यान आज सकाळपासून माध्यमांमध्ये याबद्दलच्या बातम्या झळकल्यानंतर भाजपच्या वरिष्ठांनीही या वादग्रस्त बॅनर्सची दखल घेतली आहे. भाजपच्या वरिष्ठांकडून आमदार महेश लांडगे यांचे समर्थक निलेश बोराटे यांना हे वादग्रस्त बॅनर्स हटवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आहे. आज संध्याकाळपर्यंत हे बॅनर्स काढण्यात येणार असल्याचीही माहिती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in