पुण्यात भाजपा-सेनेतला तणाव निवळणार ?

भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी ‘राऊत यांना गणेशोत्सवात पुण्यात फिरून देणार नाही,’ अशी घोषणा केली होती
पुण्यात भाजपा-सेनेतला तणाव निवळणार ?
sena-bjp.jpg

पुणे : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल गेल्या महिन्यात केलेल्या वक्तव्यानंतर पुण्यात भाजपा-सेनेत निर्माण झालेला तणाव पोलिसांच्या प्रयत्नांनंतर निवळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(BJP-Sena tensions to be resolved in Pune?) 

 गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबद्दल काही वक्तव्य केले होते. यानंतर पुण्यातील भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना आव्हान प्रतिआव्हान दिले होते. या काळात शिवसेना नेते संजय राऊत यांनी केलेल्या एका विधानाच्याविरोधात भाजपाच्या लिगल सेलकडून पुण्यात डेक्कन पोलिस ठाण्यात तक्रारही देण्यात आली होती.त्यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी ‘राऊत यांना गणेशोत्सवात पुण्यात फिरून देणार नाही,’ अशी घोषणा केली होती. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी शिवसेनेचे शहर प्रमुख संजय मोरे, गटनेते पृथ्वीराज सुतार, श्याम देशपांडे, विशाल धनवडे यांनी प्रतिआव्हान दिले होते. 

या पार्श्वभूमीवर राऊत यांचा गणेशोत्सवानंतर पुणे दौरा आहे. ही बाबत लक्षात एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने दोन्ही पक्षांमधील प्रमुख कार्यकर्त्यांशी चर्चा केली. उत्सवाच्या काळात आव्हान- प्रतिआव्हान दिल्यास वातावरण चिघळेल, असे नमूद केले. तसेच उत्सवाला प्राधान्य देण्याचे आवाहन करीत दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची मनधरणी केली. त्यानंतर दोन्ही बाजूने समंजसपणा दाखविण्यात आला.त्यामुळे राऊत यांच्या नियोजित दौऱ्यादरम्यान होऊ शकणारा तणाव निवळण्यास मदत झाली आहे. 

मात्र, खासदार राऊत २२ किंवा २३ सप्टेंबर रोजी पुण्यात येणार असून त्यावेळी त्यांच्यासाठी कार्यकर्त्यांचा मेळावा वडगाव शेरीमध्ये होणार असल्याचे शिवसेनेने स्पष्ट केले. तर, पोलिसांच्या विनंतीला मान देऊन हा विषय ताणणार नसल्याचे भाजपच्या प्रमुख कार्यकर्त्यांनी स्पष्ट केले.

Edited By : Umesh Ghongade

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in