पुणे महापालिका जिंकण्यासाठी एच. के पाटील यांचा काॅंग्रेसला कानमंत्र

काॅंग्रेस नेत्यांनी पुण्यात लक्ष घालण्यास सुरवात केली आहे.
Patole-H.K. Patil
Patole-H.K. PatilSarkarnama

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने ॲअॅमेझॉन घोटाळ्यात साडेआठ हजार कोटींचा भ्रष्टाचार केला आहे. त्याचा पर्दाफाश करा आणि महापालिकेची आगामी निवडणूक एकदिलाने लढून जास्तीत जास्त जागा जिंका, असे आवाहन अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्राचे प्रभारी एच. के. पाटील यांनी आज पुण्यात केले.

पाटील यांनी काँग्रेस भवनाला भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधला. याप्रसंगी पक्षाचे शहराध्यक्ष रमेश बागवे आणि प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांच्या हस्ते श्री विठ्ठलाची मूर्ती देऊन आणि सूती हार घालून पाटील यांचा सत्कार करण्यात केला.

Patole-H.K. Patil
संघटनेतून काढून टाकण्याचा आधिकार शशिकांत पवारांना नाही : राजेंद्र कोंढरे

केंद्रातील भाजप सरकारने जनतेचा अपेक्षाभंग केला आहे. महागाई, बेरोजगारी या समस्या उग्र झाल्या आहेत. कोरोनाची साथही नीट हाताळली नाही. खाजगीकरणाच्या नावाखाली अनेक सरकारी संस्था अदानी, अंबानी यांना सुपूर्द केल्या आहेत. कामगार कायदे बदलून कामगारांना असुरक्षित केले आहे, अशी टीका पाटील यांनी केली.

अमेरिकन बहुराष्ट्रीय कंपनी ॲअॅमेझॉनला मदत करण्यासाठी केंद्र सरकारने आठ हजार ५४६ कोटीचा भ्रष्टाचार केला आहे, असा आरोप पाटील यांनी केला. ॲअॅमेझॉन घोटाळ्यामुळे छोटे व्यापारी आणि दुकानदारांचे नुकसान झाले, असे पाटील यांनी सांगितले.

Patole-H.K. Patil
पुण्यातील पाच आमदारांना तिकीट नाही मिळणार!

काँग्रेस पक्षाने सत्तेत असताना पुणे महापालिकेत विकासाची अनेक कामे केली. पुण्याला माहिती-तंत्रज्ञानाचे केंद्र केले. परंतु, खोटी आश्वासने देऊन महापालिकेत सत्तेत आलेला भाजपा शहर विकास करण्यात अपयशी ठरला, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली. सर्व घटकांना एकत्रित घेऊन काम करणाऱ्या काँग्रेसला पुणेकर यश देतील, असा विश्वास पटोले यांनी व्यक्त केला.

Edited By : Umesh Ghongade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com