Jejuri Trustees Dispute : जेजुरी मंदिर विश्वस्त निवडीला विरोध करत भाजप पदाधिकाऱ्यांचा राजीनामा

Jejuri News : विश्वस्तांच्या निवडीविरोधातातील आंदोलनांस पाठिंबा वाढत असल्याने वाद टिपेला
Jejuri Temple, BJP
Jejuri Temple, BJPSarkarnama

Martand Devsansthan Trustee : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीच्या खंडोबा गडाचा कारभार पाहणाऱ्या श्री मार्तंड देवसंस्थानच्या सात विश्वस्तांच्या निवडीवरून वाद चिघळला आहे. ही निवड पुणे सहधर्मादाय आयुक्तांनी केली आहे. त्यांनी देवसंस्थानच्या सातपैकी पाच बाहेरील विश्वस्तांची निवड केली आहे. त्या विश्वास्तांनी पदभार स्वीकारला आहे. दरम्यान, या निवडीच्या निषेधार्थ जेजुरी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. (Jejuri Devsansthan Trustee)

Jejuri Temple, BJP
Jejuri Trustees Dispute : जेजुरी विश्वस्तांचा वाद टिपेला; चक्री उपोषणाची महिनाभराची तयारी !

जेजुरीबाहेरील निवडलेल्या या विश्वस्तांच्या निवडीचा जेजुरी खांदेकरी -मानकरी ग्रामस्थ मंडळासह ग्रामस्थांनी निषेध केला आहे. आंदोलन करून आपला रोषही व्यक्त केला. या निवडीच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी पुणे-पंढरपूर महामार्गार रास्ता रोको आंदोलन केले. निवडलेल्या विश्वस्त मंडळाला कोणत्याही प्रकारचे सहाकर्य न करण्याचा ठरावही ग्रामस्थांनी मंजूर केला आहे. विश्वस्त मंडळात पुजारी वर्गातून एकाला प्रतिनिधीत्व मिळण्याची मागणीही जोर धरू लागली आहे. आता जेजुरी येथे या निवडीच्या निषेधार्थ चक्री उपोषण सुरू आहे. या चक्री उपोषणाचा आज मंगळवारी (ता. ३० मे) पाचवा दिवस आहे.

Jejuri Temple, BJP
Ranjeet Deshmukh News : आमदारच रेतीच्या धंद्यात गुंतला असेल तर.., रणजीत देशमुखांचा केदारांवर थेट वार !

दरम्यान, जेजुरी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. याबाबत 'सरकारनामा'शी बोलताना जेजुरी भाजप शहराध्यक्ष सचिन पेशवे (Sachin Peshave) म्हणाले, "जेजुरी विश्वस्तपदी एकाच पक्षांतील लोकांच्या निवडी झाल्याचा आरोप होत आहे. मात्र तसे काही नाही. या नियुक्त्या धर्मदाय आयुक्त कार्यालयातून झाल्या आहेत. समस्त ग्रामस्थ खांडेकरी मानकरी मंडळाचे म्हणणे आहे की या विश्वस्त मंडळावर कोणत्याही पक्षातील सदस्यांची नेमणूक करावी, मात्र ते स्थानिक असावेत. अशीच एक जेजुरीकर म्हणून माझी मागणी आहे."

जेजुरी देवसंस्थानच्या विश्वस्तपदांवरील निवडीच्या निषेधार्थ सध्या ग्रामस्थांनी चक्री उपोषण सुरू केले आहे. या उपोषणाला ग्रामस्थांसह विविध संघटना, गणेश मंडळांसह सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांचा पाठिंबा वाढत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. दरम्यान, जेजुरी भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदांचा राजीनामा दिला आहे. या पदाधिऱ्यांध्ये शहराध्यक्ष सचिन पेशवे, उपाध्यक्ष पंकज घोले, कार्याध्यक्ष गणेश भोसले, सरचिटणीस प्रसाद अत्रे, लिगल सेलचे अध्यक्ष अॅड. अशोक भोसले, ओबीसी सेलचे अलका शिंदे याचा समावेश आहे.

Jejuri Temple, BJP
Cabinet Decision: शिंदे-फडणवीस सरकारचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा; राज्य मंत्रिमंडळाचे 12 मोठे निर्णय

याबाबत जेजुरी भाजप (BJP) शहराध्यक्ष सचिन पेशवे म्हणाले, "जेजुरीतील खंडोब हे महाराष्ट्राचे कुलदैवत आहे. येथे आठरा पगड जातीतील, बहुजनांचे कुलदैवत आहे. येथे वर्षभरात सात यात्रा होतात. त्यानिमित्त येथे राज्यभरातून मोठ्या प्रमाणात भाविक येतात. येथील रुढी परंपरांचा स्थानिकांना जाण आहे. त्यांची संपूर्ण माहिती जेजुरीकरांना आहे. येथे यात्रा-उत्सवांची संपूर्ण माहिती स्थानिकांना आहे. याबाबत सविस्तर माहिती बाहेरच्या लोकांना माहिती नसते. यात्राकाळात स्थानिक व्यक्ती गावातील विविध समाजांना बरोबर घेऊन जाण्यास प्राधान्य देतात. त्यामुळे विश्वस्तपदांवर जास्तीत जास्त संख्या स्थानिक लोकांची असावी, अशी आमची मागणी आहे."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com