BJP News: जिल्हाध्यक्षांनीच केली भाजपची पंचाईत; संभाजी महाराजांचा उल्लेख 'स्वराज्यरक्षक' असा केला

BJP Leader Ganesh Bhegade News : पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे यांचा भाजपला घरचा आहेर....
Ganesh Bhegade Latest news
Ganesh Bhegade Latest newsSarkarnama

Pune News : राज्य विधीमंडळाच्या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराजांचा उल्लेख स्वराज्यरक्षक असा केल्याने त्यावरून राज्यभर भाजपकडून मोठे रान पेटवण्यात आले. संभाजीराजे हे धर्मवीर होते असा त्यांचा हेका आहे.

धर्मवीर आणि स्वराज्यरक्षकवरुन भाजप आणि राष्ट्रवादीत वाद पेटला आहे. मात्र, याचदरम्यान भाजपच्या जिल्हाध्यक्षाकडून छत्रपती संभाजीराजेंच्या राज्यभिषेक दिनी त्यांना अभिवादन करताना त्यांचा स्वराज्यरक्षक असा उल्लेख केल्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

धर्मरक्षक की धर्मवीर हा गेल्या महिन्यातील हा वाद नवीन वर्षातही कायम राहिला आहे.संभाजीराजेंच्या ३४३ व्या राज्याभिषेकदिनीही आज (ता.१६)त्याचे पडसाद उमटले. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील,राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन,आमदार नितेश राणे आदी भाजप(bjp) नेत्यांनी धर्मवीर असाच संभाजी महाराजांचा उल्लेख करीत राज्याभिषेक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

Ganesh Bhegade Latest news
Gulabrao Patil : 'ज्या ताटात खाल्लं त्याच ताटात घाण करायची आपली संस्कृती नाही'

दुसरीकडे अजित पवार हे आपल्या विधानावर ठाम असून त्यांनी स्वराज्यरक्षक असाच उल्लेख संभाजीराजेंचा आजही त्यांच्या राज्याभिषेकदिनी केला.एवढेच नाही,तर स्वराज्यरक्षक संभाजी महाराज असा मजकूर असलेले होर्डिंग्ज राष्ट्रवादीने पुण्यात आज लावून भाजपला डिवचले. पुणे जिल्हा भाजपचे अध्यक्ष गणेश भेगडे यांनी,मात्र स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक दिन असा उल्लेख केल्याने भाजपला हा घरचा आहेर मिळाला आहे. त्यांच्या या फेसबुक पोस्टची मोठी चर्चा सकाळपासून सुरु झाली होती.

Ganesh Bhegade Latest news
Shivsena News: शिवसेनेच्या गंगाधर नाकाडेंची माघार, इटकेलवारांचे तत्काळ निलंबन !

यामुळे 'सरकारनामा'नं त्यांच्याशी संपर्क साधला असता, मी स्वत: ही पोस्ट केली नसून ती माझ्य़ा टीमने केली असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर काही वेळातच स्वराज्यरक्षक असा उल्लेख असलेली पोस्ट काढून टाकण्यात आली. नव्या पोस्टमध्ये धर्मवीर असे म्हटले आहे.

दरम्यान,भाजप व राष्ट्रवादीतील या वादाचे (धर्मवीर विरुद्ध स्वराज्यरक्षक) पडसाद सोशल मिडियात जोरदारपणे आज पुन्हा उमटले.मात्र,स्वराज्यरक्षक संभाजी या मालिकेतील संभाजी महाराजांच्या मध्यवर्ती भुमिकेव्दारे घराघरात पोचलेले व या भुमिकेचा लोकसभा निवडणुकीतील विजयाला हातभार लागलेले शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी,मात्र या वादावर काहीशी सामंजस्याची भूमिका घेतली आहे. स्वराज्यरक्षक ही संकल्पा व्यापक असल्याचे सांगत यात राजकारण न करता संभाजीमहाराजांचे विचार व इतिहास सगळ्यांपर्यंत जाणे गरजेचा आहे,असे ते म्हणाले.

---------

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com