भाजप कार्यालयात राष्ट्रवादीचे पदाधिकारी! म्हणतात, हीच राजकारणाची संस्कृती

भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना सदिच्छा भेटीसाठी आमंत्रित केले होते.
BJP-NCP
BJP-NCP Prashant Jagtap

पुणे : राजकारणात (Politics) कितीही मतभेद असले तरी ते फक्त राजकारणापुरतेच मर्यादित असतात, असे म्हटले जाते. राज्यात भाजप (BJP) -महाविकास आघाडीतील (Mahavikas Aghadi) पक्षांशी कितीही मतभेद असले तरी तेही राजकारणापुरतेच मर्यादित आहेत. याचीच प्रचिती नुकतीच पाहायला मिळाली.

पुण्यात नुकतेच भारतीय जनता पार्टीच्या नव्या कार्यालयाचे उद्घाटन सोहळा पार पडला. या सोहळ्यात भाजपने राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांना सदिच्छा भेटीसाठी आमंत्रित केले होते. राष्ट्रवादीचे अनेक नेते या सोहळ्याचा उपस्थित होते. राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) यांनी नुकतीच याबाबत फेसबुकपेजच्या माध्यमातून माहिती दिली.

BJP-NCP
वाद पेटला! आव्हाड भडकले अन् थेट आमदार महेश शिंदेंची लाज काढली

''भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी आमचे स्वागत केले. दोन्ही पक्षांमध्ये वैचारिक मतभेद असले तरी मनभेद मात्र नाही. राजकारणाच्या वेळी राजकारण आणि शहर विकासासाठी सलोखा ही पुण्याची राजकीय संस्कृतीच आहे. आज या संस्कृतीचा पुन्हा एकदा प्रत्यय पाहायला मिळाला. यावेळी मकर संक्रांतीच्या निमित्ताने एकमेकांना तिळगुळाचे लाडू भरवत शुभेच्छा देण्यात आल्या.

याप्रसंगी माझ्यासह आमदार सुनीलआण्णा टिंगरे, विरोधी पक्षनेत्या दिपालीताई धुमाळ, ज्येष्ठ नेते अंकुश काकडे, माजी महापौर राजलक्ष्मी भोसले, माजी अध्यक्ष रवींद्र माळवदकर, युवक अध्यक्ष किशोर कांबळे, महेश हांडे आदी उपस्थित होते. दरम्यान, मनसे पदाधिकाऱ्यांनीही या कार्यक्रमाला हजेरी लावली होती.

तर, राजकारणात कायम एकमेकांवर राजकीय विषयांवर कायम टिका केली जाते. कधी आम्ही विरोधी पक्षांवर टिका करतो तर कधी ते आमच्यावर ! वैचारिक मतभेद असले तरी आम्ही सर्व पुणेकर या भावनेने एकत्र आलो असल्याची भावना यावेळी जगदीश मुळीक यांनी व्यक्त केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in