मुख्यमंत्र्यांना दररोज फोन करतो, पण ते फोन घेत नाहीत!

संसदेच्या हिवाळी अधिवेशन काळात कधी कधी संजय राऊत भेटतात. त्यावेळी तुमचे साहेब कसे आहेत? अशी विचारणा त्यांना करतो. 'आमचे साहेब चांगले आहेत,' असे उत्तर राऊत देतात, असंही राणे म्हणाले.
uddhav thackeray, narayan rane
uddhav thackeray, narayan ranesarkarnama

पुणे : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या मानेवर नुकतीच शस्त्रक्रिया करण्यात आली. सध्या ते विश्रांती घेत आहेत, यावर केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी त्यावर भाष्य केलं आहे. मुख्यमंत्र्याची तब्येत ठीक नाही. त्यामुळे तुम्ही त्यांची विचारपूस केली की नाही? असा प्रश्न राणेंना विचारण्यात आला होता. राणे पुण्यात एका कार्यक्रमाला उपस्थित होते. त्यावेळी ते बोलत होते.

नारायण राणे म्हणाले, ''मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या तब्येतीची दररोज विचारपूस करतो. त्यांना फोन करतो, पण ते फोन घेत नाहीत. शिवसेनेच्या ओळखीच्या नेत्यांकडे मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीबाबत विचारत असतो.'' संसदेच्या हिवाळी अधिवेशनात काळात कधी कधी शिवसेनेचे खासदार संजय राऊत भेटतात. त्यावेळी तुमचे साहेब कसे आहेत? अशी विचारणा त्यांना करतो. 'आमचे साहेब चांगले आहेत,' असे उत्तर संजय राऊत देतात, असंही राणे म्हणाले. ''राऊत संसदेच्या लॅाबिगमध्ये चांगलं बोलतात,'' असा टोमणा राणेंनी यावेळी लगावला.

नारायण राणे म्हणाले, ‘‘अटल शक्ती अभियानाच्या माध्यमातून पुणे महापालिकेत आपल्याला पुन्हा एकदा सत्ता मिळावी, यादृष्टीने मार्गदर्शन करण्यात आले. सध्या ९८ नगरसेवक आहेत, यावेळी १०० पेक्षा जास्त जागा याव्यात म्हणून कार्यकर्त्यांनी लोकांना भेटून आपण सत्ताधारी म्हणून कशा पद्धतीने काम केले आहे हे सांगण्यासाठी हे अभियान आहे.'' ''पुणे महापालिकेत शिवसेनेचे सध्या १० नगरसेवक आहे, पण ते आता शून्य कसे होतील हेच आमचे लक्ष आहे,''

राज्याचे विधीमंडळाचे अधिवेशन कमी दिवसाचे घेता यावे, यासाठी निर्बंध लादले लागते आहेत. दोन वर्ष कोरोनामुळे लोकांची आर्थिक स्थिती कमकुवत झाली असून, आत्ताच निर्बंध घालू नये.

आत्ताचे मुख्यमंत्री जेव्हा सरकार नव्हते त्यावेळी सत्तेत आल्यावर तुमचा सातबारा कोरा करू, वीज फुकट देऊ, हेक्टरी ५० हजार रुपये देऊ असे सांगत होते. मग आता सत्ता असताना आश्वासनापासून मागे का फिरता?, असा प्रश्‍न राणे यांनी उपस्थित केला.

uddhav thackeray, narayan rane
नार्वेकरांचं टि्वट ठाकरे सरकारच्या पायाला सुरुंग लावण्यासारखे ; चंद्रकांतदादांचा टोला

'शिवसेना युपीएत (UPA)सहभागी झाली, तरीही काहीही फरक पडणार नाही, भाजपचे (bjp) ३०३ खासदार आहेत. शिवसेनेनं (shivsena) हिंदुत्वाशी गद्दारी केली असून त्यांनी बेईमानी करुन सत्तेसाठी हिंदुत्व गुंडाळून टाकलं आहे. शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) काहीही बोलतात, त्यांचे महापालिकेत १० नगरसेवक आहेत, त्यांची देशात सत्ता येणार का,'' असा सवाल केंद्रीयमंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी उपस्थित केला. ''फुगवून फुटतात, त्याला संजय राऊत म्हणतात,'' असा टोमणा त्यांनी यावेळी लगावला.

भाजपचे नगरसेवक पक्ष सोडून बाहेर जाण्याचा प्रयत्न करणार नाही. आमची बोट एकदम सुरक्षीत असून, इथून सुटली की सुरक्षितपणे थेट दिल्लीत थेट जाते. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस ही बुडणारी टायटॅनिक आहे. या जहाजाला प्रत्येकजण आपापल्या बाजूने खेचत असल्याने या बुडणाऱ्या जहाजात कोणी बसणार नाही. तसेच शिवसेनेचे आता १० नगरसेवक आहेत, ते शून्य होतील, अशी टीका राणे यांनी केली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in