Udayanraje Bhosale : महाविकास आघाडीच्या महामोर्चात उदयनराजेंची 'आघाडी'

Udayanraje Bhosale News : नुपूर शर्मा यांच्यावर कारवाई मग कोश्यारी यांच्यावर का नाही?
MP Udayanraje Bhosale
MP Udayanraje Bhosalesarkarnama

Udayanraje Bhosale News : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी निषेध म्हणून आज पुणे शहरात महाविकास आघाडीसह (Mahavikas Aghadi) शिवप्रेमी संघटनांनी बंद पाळला. या मोर्चामध्ये विविध राजकीय पक्ष आणि अनेक सामाजिक संघटना सहभागी झाल्या होत्या. तसेच भाजपचे (BJP) खासदार छत्रपती उदयनराजे भोसले हे देखील सहभागी झाले होते.

या मोर्चा दरम्यान बोलताना उदयनराजे यांनी केंद्र सरकारवर (Central Govt) निशाणा साधत भाजपच्या महिला प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी जशी कारवाई झाली, तशी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर का नाही? असा सवाल केला.''नुपूर शर्माला (Nupur Sharma) जो न्याय मिळाला तोच कोश्यारींना का नाही?'', असे ते म्हणाले.

MP Udayanraje Bhosale
Aurangabad : विद्यापीठ सिनेट निवडणुकीत राष्ट्रवादीचे एकहाती वर्चस्व ; १८ पैकी १५ जागा जिंकल्या..

नुपूर शर्मा यांनी मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर भाजपने शर्मा यांचा राजीनामा घेत त्यांच्यावर कारवाई केली होती. या पार्श्वभूमीवरच उदयनराजेंनी केंद्र सरकारला संतप्त सवाल केला. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी कोश्यारी यांच्यावर कारवाई करावी, यासाठी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) आणि राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (Droupadi Murmu) यांना पत्रही लिहिले होते.

MP Udayanraje Bhosale
Fadnavis's Dream Project : फडणवीसांचा ‘ड्रीम प्रोजेक्ट’ पुन्हा सुरू होणार; मंत्रिमंडळाने दिली मंजुरी

तर उदयनराजे यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचा निषेध नोंदवत रायगडावर आत्मक्लेश आंदोलनही केले होते. दरम्यान, या सर्व घडामोडींवर भाजप नेत्यांनी सारवा सारव करण्याचा प्रयत्न केला. उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे सध्या भाजपमध्ये (BJP) आहेत. मात्र, त्यांनी याबाबत आक्रमक पवित्रा घेतला आहे.

MP Udayanraje Bhosale
Sharad Pawar News : अखेर शरद पवारांना धमकी देणाऱ्या व्यक्तीचा शोध लागला

एवढंच नव्हे तर आज पुण्यात पार पडलेल्या महाविकास आघाडीसह वेगवेगळ्या संघटनांच्या बंद आंदोलनामध्ये ते सहभागी झाले. मात्र, या मूक मोर्चामध्ये भाजपचं दुसरं कोणीही दिसलं नाही. तर नुपूर शर्मा यांच्यावर भाजपने कारवाई केली, मग भगतसिंह कोश्यारी यांच्यावर का नाही? असा सवालही त्यांनी या मोर्चा दरम्यान केला. उदयनराजे हे भाजपकडून राज्यसभेत खासदार आहेत. मात्र, तरी देखील भाजपच्या विरोधात ते आक्रमक झाले असून भाजपला सवाल करत आहेत. तर दुसरीकडे आघाडीच्या मोर्चामध्ये सहभागी झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com