BrijBhushan Singh News : भाजप खासदाराने मानले राज ठाकरेंचे आभार ; म्हणाले, '..तो विषय आता..'

BrijBhushan Singh News : राज यांच्याशी माझे व्यक्तीगत वैर नाही.ते आले तर त्यांची भेट घेऊ,
BrijBhushan Singh, Raj Thackeray
BrijBhushan Singh, Raj Thackeraysarkarnama

BrijBhushan Singh News : उत्तर प्रदेशमधील भाजपाचे खासदार बृजभूषण सिंह (BrijBhushan Singh) यांनी मनसे पक्षप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. त्यामुळे राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा पुढे ढकलला आहे. या घटनेनंतर काल (शनिवारी) बृजभूषण सिंह हे पुण्यात आले होते.

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभाला ते उपस्थित होते. "माझ्या महाराष्ट्राला दौऱ्याला विरोध न केल्याबद्ल मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे आभार. राज यांच्याशी माझे व्यक्तीगत वैर नाही.ते आले तर त्यांची भेट घेऊ," असे बृजभूषण सिंह म्हणाले. (BrijBhushan Singh News)

उत्तरप्रदेशातील नागरिकांना महाराष्ट्रात त्रास झाला होता, यावर राज ठाकरे यांनी माफी मागावी, अशी मागणी बृजभूषण सिंह यांनी केली होती. त्यावर पत्रकारांनी त्यांना विचारले असता ते म्हणाले, "तो विषय आता संपला आहे," अशा शब्दात त्यांनी या विषयावर बोलणं टाळलं . "आज मी कुस्तीसाठी आलो आहे. आज अयोध्या आणि राज ठाकरेंचे प्रकरण सुरु नाही. आज तरी मी कुस्तीचा प्रचार करण्यासाठी आलो आहे. कुस्ती आणि खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी मी आलो आहे," असे ते म्हणाले.

BrijBhushan Singh, Raj Thackeray
Ganga Vilas River Cruise News : मोदींच्या गंगा विलास रिव्हर क्रूझला 'या' राज्यांची आडकाठी

राज यांच्याशी वाद नाही

"राज ठाकरे यांच्याशी माझा वैयक्तिक वाद नाही. राज ठाकरे यांचा मी सैद्धांतिक मुद्यावर विरोध केला होता. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशमध्ये कधीच दुरावा नव्हता. दोन्ही राज्यांचे आपसात प्रेम आहे. उत्तर प्रदेशमधील असंख्य लोक महाराष्ट्रात येऊन आपली उपजीविका भागवतात. माझाही कधी महाराष्ट्राला विरोध नव्हता,” असे ते म्हणाले.

BrijBhushan Singh, Raj Thackeray
Shiv Sena News : उद्धव ठाकरेंना धक्का : SRA घोटाळ्याप्रकरणी मोठ्या नेत्यांविरोधात गुन्हा दाखल

खेळात राजकारण आणू नको..

भारतीय कुस्ती संघातील राजकारणावर बृजभूषण सिंह म्हणाले, "भारतीय कुस्ती संघाला कुणीही आव्हान देऊ शकत नाही. ज्या कुस्ती संघाचा मी अध्यक्ष आहे. त्या संघाला महाराष्ट्र कुस्ती संघाने मतदान केलेलं आहे. मी त्यांच्या सहमतीने निवडून आलेलो आहे. माझे मत आहे की, खेळात राजकारण न करता खेळाची प्रगती होईल, असा दृष्टीकोन ठेवला पाहीजे. जो खेळात राजकारण आणेल त्याला सर्वांनी मिळून विरोध केला पाहीजे,"

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com