अजितदादांचा चंद्रकांत पाटलांविषयीचा अंदाज खरा ठरल्यास माधुरी मिसाळांना लॉटरी?

नव्या सरकारमध्ये कोण मंत्री होणार याबाबत चर्चांना उधाण आलं आहे.
Ajit Pawar Latest Marathi News, Madhuri Misal Latest News, Chandrakant Patil Latest News
Ajit Pawar Latest Marathi News, Madhuri Misal Latest News, Chandrakant Patil Latest NewsSarkarnama

पुणे : राज्यात सत्ताबदल झाल्यानंतर आता पुण्याचे पालकमंत्री पद कुणाकडे जाणार, याबाबत चर्चांना उधाण आलं. त्यातच विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी विधानसभेत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांच्याविषयी केलेल्या वक्तव्यामुळे पुण्यातील भाजप (BJP) कार्यकर्त्यांमध्येही संभ्रम निर्माण झाला आहे. पाटील यांचंच मंत्रिपद नक्की नसल्याचा दावा पवारांनी केला होता. त्यामुळे पाटील यांच्याजागी पुण्यातून कोण, याबाबत तर्कवितर्क लढवले जाऊ लागले आहे. (Ajit Pawar Latest Marathi News)

शिंदे सरकारे सोमवारी विधानसभेत 164 मतं मिळवत बहुमत चाचणी जिंकली. त्यानंतर अभिनंदनाच्या प्रस्तावावर बोलताना अनेक नेते दिलखुलासपणे बोलले. एकमेकांचं कौतुक करत, चिमटे काढत सर्वच नेत्यांनी जोरदार टोलेबाजी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मनमोकळ्या भाषणानं तर सभागृहातील अनेकांची मनं जिंकली. सरकारने अग्निपरीक्षा पार केल्यानंतर आता मंत्रिमंडळाची चर्चा सुरू झाली आहे.

Ajit Pawar Latest Marathi News, Madhuri Misal Latest News, Chandrakant Patil Latest News
शिवसेनेचे पाच माजी नगरसेवक शिंदे गटाच्या वाटेवर; मुख्यमंत्री लवकरच पुण्यात

या चर्चेदरम्यान बोलताना अजित पवारांनी चंद्रकांतदादांचे टेन्शन वाढवले. अजितदादा म्हणाले की, 'दादा, बाकडे वाजवू नका, तुमच्याच मंत्रिपदाबाबत नक्की नाही.' पवारांच्या या वक्तव्यानंतर पुण्यात मात्र भाजप कार्यकर्त्यांमध्येच चर्चा रंगू लागल्या आहेत. युती सरकारच्या काळात चंद्रकांत पाटील महसूल मंत्री होते. त्याच सरकारमध्ये खासदार गिरीश बापट यांच्याकडे अन्न व नागरी पुरवठा मंत्रिपद होतं. तसेच तेच पालकमंत्री होते. पण बापट लोकसभेत गेल्यानंतर काही महिन्यांसाठी पाटील यांच्यावर पालकमंत्रिपदाची जबाबदारी आली.

आता पुन्हा भाजप सत्तेत आल्याने पुण्याचे पालकमंत्री कोण, याची चर्चा सुरू झाली आहे. पुढील काही महिन्यांवर पुण्यासह राज्यात अनेक महापालिकांच्या निवडणुका आहेत. पक्षाला 2024 ची विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीची तयारी करायची आहे. त्यासाठी प्रदेशाध्यक्ष म्हणून चंद्रकांत पाटील यांच्याकडे मंत्रिपद देऊ नये, असा पुण्यातील काही पदाधिकाऱ्यांचा सूर आहे.

Ajit Pawar Latest Marathi News, Madhuri Misal Latest News, Chandrakant Patil Latest News
'राष्ट्रवादी'च्या स्थापनेनंतर पहिल्यांदाच असं घडलं अन् अजितदादांना मिळाला पहिला मान!

तर चंद्रकांत पाटील हे कोथरूड मतदारसंघातून निवडून आले आहेत. त्यासाठी मेधा कुलकर्णी यांचं तिकीट कापण्यात आल्याने बरीच बरीच उलटसुलट चर्चाही झाली. त्यामुळे आमदार माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांना कॅबिनेट मंत्रिपद देऊन हा ठपका पुसून टाकण्याची संधी भाजपकडे आहे. पुण्यात मिसाळ यांच्यासह भीमराव तापकीर हेही ज्येष्ठ आमदार आहेत. पण मिसाळ यांचं पारडं जड असल्याचं बोललं जात आहे. असं झाल्यास मिसाळ यांच्याकडे पालकमंत्रिपदही येण्याची शक्यता आहे.

चंद्रकांत पाटील यांच्या गटाला मात्र तेच पालकमंत्री होतील, याची खात्री आहे. पाटील हे आता पुण्यातीलच लोकप्रतिनिधी आहेत. मागील अनेक वर्षांपासून ते पुण्याशी जोडले गेले आहेत. त्यामुळे आगामी पालिका निवडणुकीच्या तोंडावर त्यांनाच पालकमंत्री करणं पक्षासाठी फायदेशीर ठरेल, असा दावा काही पदाधिकाऱ्यांकडून केला जात आहे. त्यामुळे आता शिंदे सरकारमध्ये पुण्यातील कोणत्या नेत्याला कॅबिनेट मंत्रिपद आणि पालकमंत्रिपद मिळणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com