Laxman Jagtap
Laxman JagtapSarkarnama

मोठी बातमी : भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल

भाजपचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landage) यांनी माहिती दिली आहे

पिंपरी : चिंचवड (Pimpri-Chinchwad) विधानसभा मतदार संघाचे भाजपचे (BJP) आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यानंतर उलट सुलट चर्चा सुरु झाल्या आहेत. या प्रकरणी आता भाजपचे आमदार महेश लांडगे (Mahesh Landage) यांनी पुढे येत माहिती दिली आहे.

Laxman Jagtap
मानवी कल्याणासाठी स्वतःला झोकून देणे, हीच डॉ. बाबासाहेबांना खरी आदरांजली...

लक्ष्मण जगताप यांच्यावर बाणेर येथील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. आम्ही आता रुग्णालयामध्येच आहोत. जगताप यांच्यावर उपचार करणाऱ्या डॅाक्टरांशी बोलणे झाले आहे, असेही लांडगे यांनी सांगितले. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. लवकरच जगताप हे कार्यकर्त्यांच्या भेटीला पुन्हा येतील, अशी माहिती लांडगे यांनी दिली आहे. सर्व कार्यकर्त्यांना विनंती आहे, की त्यांनी घरीच थांबावे, लक्ष्मणभाऊ यांची प्रकृती चांगली झाल्यानंतर ते कार्यकर्त्यांना भेटतील, असे लांडगे यांनी सांगितले.

Laxman Jagtap
विक्रम राठोडांना पुन्हा जीवे मारण्याची धमकी

जगताप यांना रुग्णालयात दाखल केल्याने त्यांच्या प्रकृती विषयी शहरात उलट-सुलट चर्चा सरु आहेत. त्यांची प्रकृती खालवल्याचेही सांगितले जात होते. मात्र, लांडगे यांनी याबाबत माहिती दिली आहे. जगताप यांनी नुकतेच अमेरिकेमध्येही उपचार घेतले होते. अनेक दिवसांपासून त्यांच्या प्रकृतीबद्दल चर्चा सुरु आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com