Pimpri-Chinchwad : राजकीय नैराश्यातून काँग्रेस नेत्यांची पोपटपंची; मोदींवरील टीकेला आमदार लांडगेंचे उत्तर

Mla Mahesh Landge : "गांधी परिवाराने पंतप्रधानांवर व्यक्तिगत चिखलफेक करताना राजकीय संस्कृती खुंटीवर टांगली..."
Mla Mahesh Landge
Mla Mahesh LandgeSarkarnama

पिंपरी : कर्नाटक विधानसभा निवडणूक प्रचारात काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा उल्लेख विषारी साप असा केल्याने भाजपचे नेते चांगलचेच आक्रमक झाले. कर्नाटकातील भाजप आमदार बासनगौडा यांनी खर्गेंच्या टीकेचा समाचार घेताना काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांना विषकन्या संबोधले.

आता कर्नाटकातील प्रचाराचे पडसाद महाराष्ट्रात देखील उमटू लागले आहेत. पिंपरी-चिंचवडमधील भोसरीचे भाजप आमदार आणि शहराध्यक्ष महेश लांडगे यांनी राजकीय नैराश्यातून काँग्रेस नेत्यांची पोपटपंची सुरु असल्याचा प्रतिहल्ला आज केला. खर्गेंच्या टीकेचा निषेध करताना अशा हीन आरोपांना जनता मतदानातूनच पुन्हा काँग्रेसला जागा दाखवून देईल, असे ते म्हणाले.

मोदींवर व्यक्तिगत टीका करणे व त्यांच्या आडनावावरून पोरकट वक्तव्ये करणे महागात पडते हे आता सोनिया गांधी, राहुल गांधी व वाड्रा कुटुंबास पुरेपूर उमगल्याने आता पाळीव पोपटांच्या मुखातून, असे उद्योग काँग्रेसने सुरू केले आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

Mla Mahesh Landge
Ajit Pawar : मुख्यमंत्रिपदासाठी राष्ट्रवादीतून कोण, जयंत पाटील की अजित पवार? प्रवक्ते म्हणतात...

दरम्यान, भाजप आणि काँग्रेसच्या या भांडणात प्राणी, नाहक भरडले जात आहेत. त्यांची तुलना करून बदनामी केली जात आहे,अशी उपरोधिक चर्चा या दोन प्रमुख राष्ट्रीय राजकीय पक्षांच्या वादावर ऐकायला मिळाली.

मोदी हे विषारी साप असल्याचे वक्तव्य करून खर्गे यांनी गांधी कुटुंबाची संस्कृती जिवंत असल्याचे सिद्ध केले आहे, अशी कोपरखळी आमदार लांडगे यांनी मारली. याआधी गांधी परिवाराने पंतप्रधानांवर व्यक्तिगत चिखलफेक करताना राजकीय संस्कृती खुंटीवर टांगली होती. ‘‘मौत का सौदागर, खून का दलाल’’ अशा शब्दांत सोनिया गांधी यांनी पंतप्रधानांवर टीका केली. तेव्हा देशातील जनतेने काँग्रेसला झिडकारले.

Mla Mahesh Landge
Ajit Pawar News : 'बारसू'वरून ठाकरे गटातील मतभेद अजित पवारांनी आणले समोर; म्हणाले..

राहुल गांधींनी केलेल्या आरोपांमुळे, तर त्यांना कायदेशीर कारवाईस तोंड द्यावे लागले. अशा बेताल वक्तव्यांमुळे त्यांना खासदारकी देखील गमवावी लागली. त्यामुळे आता गांधी परिवाराची भाषा त्यांचे निष्ठावंत हुजरे बोलू लागले आहेत, अशी टीका त्यांनी केली.

देशाच्या पंतप्रधानांविषयी अशी बेताल वक्तव्ये करून अगोदरच धुळीस मिळालेली पक्षाची प्रतिमा रसातळाला नेत असल्याचे भान काँग्रेसी पोपटांना नाही, पण जनता त्यांना माफ करणार नाही, असा इशारा देतानाच, या वक्तव्याबद्दल सोनिया गांधी आणि पक्षाध्यक्ष खर्गे यांनी देशाची माफी मागावी,अशी मागणी आमदार लांडगे यांनी केली.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com