Pune BJP
Pune BJP Sarkarnama

Pune BJP Politics : भाजपने डाव टाकला; पुण्यात लोकसभा मतदारसंघ निहाय अध्यक्षांची नियुक्ती !

Pune Politics : भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या आज (ता.१९) केल्या.

Pune BJP Politics : भाजपचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यातील जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्या आज (ता.१९) केल्या. त्यात पुणे जिल्ह्यासाठी तीन नाही,तर चार अध्यक्ष देण्यात आले आहेत. प्रत्येक लोकसभा मतदारसंघनिहाय अध्यक्ष देण्याची धूर्त खेळी भाजपने केली आहे.

आतापर्यंत पुणे जिल्ह्यात भाजपचे पुणे शहर, पिंपरी-चिंचवड शहर आणि बारामती असे तीनच जिल्हाध्यक्ष होते.त्यात आता मावळची भर पडली आहे. या चौथ्या जिल्हाध्यक्षपदी पक्षाचे पुणे जिल्हा परिषदेतील माजी गटनेते तथा पुणे जिल्हा नियोजन समितीचे नामनिर्देशित सदस्य शरद बुट्टे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यावर त्यांनी सध्या राष्ट्रवादी काँग्रेसची सत्ता असलेल्या पुणे जिल्हा परिषदेत भाजपची आणण्याची प्रतिक्रिया `सरकारनामा`ला आज दिली.

Pune BJP
Dilip Mohite Patil On NCP: आमदार दिलीप मोहिते पाटील को इतना गुस्सा क्यों आया !

त्यांच्यारुपाने उच्चशिक्षीत (एमए) अध्यक्ष पुणे जिल्हा भाजपला लाभला आहे.तसेच खेड तालुक्याला खूप कालावधीनंतर भाजपचे जिल्हाध्यक्षपद मिळाले आहे. यापूर्वी या पदावर खेडचे शा.ल. घुमटकर यांनी काम केले आहे.आगामी लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद,तालुका पंचायतीच्या निवडणुकीत पक्षाची सत्ता आणण्य़ाचा निर्धार बुट्टेंनी या निवडीनंतर बोलून दाखवला.

मावळचे भाजपचे माजी आमदार बाळा भेगडे यांचे खास आभार त्यांनी आपल्या नियुक्तीवर मानले आहेत. पक्षात चैतन्य आणणार असून कार्यकर्त्यांना आधार वाटेल असे पक्षवाढीचे काम सर्वांना बरोबर घेऊन करणार आहे, असे ते म्हणाले.

Pune BJP
Kirit Somaiya Viral Video: किरीट सोमय्या आक्षेपार्ह व्हिडिओप्रकरणी पोलीस अ‍ॅक्शन मोडवर; मुंबई गुन्हे शाखेकडून तपास सुरू

पुणे जिल्ह्यासाठी चौथा जिल्हाध्यक्ष देण्याचा भाजपचा विचार असून त्यासाठी शरद बुट्टे यांचे नाव चर्चेत असल्याची बातमी `सरकारनामा`ने याअगोदरच दिली होती. ती खरी ठरली.नव्या मावळ जिल्हाध्यक्षांचे कार्यक्षेत्र शिरूर लोकसभा मतदारसंघाचे आहे.म्हणजे उत्तर पुणे जिल्ह्याचा त्यात समावेश आहे. खेड,आंबेगाव,जुन्नर,शिरूर,मावळ आणि हवेली तालुका त्यात येतो. सध्या शिरूरमध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसचे डॉ.अमोल कोल्हे खासदार आहेत.

आपला खासदार नसलेल्या १४४ ठिकाणी देशभरात २०२४ ला कमळ फुलविण्याचा निश्चय भाजपने केला आहे.त्यातून शिरूर आपोआप त्यांच्या अजेंड्यावर आला आहे.तेथून पक्षाचे भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे नाव लोकसभेसाठी घेतले जात आहे. तशी तयारीही त्यांनी सुरू केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून भाजपने बुट्टेंची नियुक्ती केली आहे.

Pune BJP
Kirit Somaiya Viral Video Update : किरीट सोमय्यांच्या व्हायरल व्हिडिओचा विषय उद्धव ठाकरेंनी एका वाक्यातच संपवला; म्हणाले..

बुट्टे यांच्या नेमणुकीने राष्ट्रवादीचे आमदार (दिलीप मोहिते-पाटील) असलेल्या खेड तालुक्यात भाजपला आता आणखी ताकद भेटली आहे. भाजप,शिवसेनेच्या राज्यातील मंत्रीमंडळात सामील झालेल्या राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाबरोबर आ. मोहिते आहेत. त्यामुळे आता महायुतीत आलेल्या या दोन्ही पाटलांना (भाजपचे शरद बुट्टे-पाटील, राष्ट्रवादीचे दिलीप मोहिते-पाटील) या कट्टर राजकीय शत्रूंना जमवून घ्यावे लागणार आहे.

एरव्ही राष्ट्रवादीत दोन जुलैला अजित पवारांचे हे बंड झाले नसते आणि भाजप आणि राष्ट्रवादी विरोधकच राहिले असते,तर हे दोन्ही पाटील एकमेकांना भिडले असते.त्यातून आगामी विधानसभा निवडणूक खूपच चुरशीची झाली असती.जिल्हा परिषद,तालुका पंचायतच नाही,तर तालुका कृषी उत्पन्न बाजार समिती आणि पुणे जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या निवडणुकीतही त्याचे तिखट परिणाम उमटले असते.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com