राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला भाजप नगरसेविकेची उपस्थिती!

राष्ट्रवादीचे शहरातील ज्येष्ठ नेते विलास लांडे-पाटील हे कोल्हेंच्या या सोहळ्याला गैरहजर राहिले.
Amol Kolhe
Amol Kolhesarkarnama

पिंपरी : पिंपरी-चिंचवड (Pimpri Chinchwad) महापालिकेतील राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नगरसेवक अजित गव्हाणे यांच्या पुढाकाराने प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ओळखपत्राचा वितरण सोहळा पक्षाचे शिरूरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या हस्ते शुक्रवारी (ता.३) रात्री भोसरीतील त्यांच्या प्रभागात झाला. त्यावरून शहर भाजपने (BJP) कोल्हेंना आज लक्ष्य केले. पंतप्रधान मोदींच्या या योजनेतून कोल्हे प्रसिद्धी घेत असल्याची टीका शहर सरचिटणीस राजू दुर्गे यांनी केली.

Amol Kolhe
'त्या' क्लिप शेलारांनी विश्वास नांगरे पाटलांकडे द्याव्यात!

दरम्यान, भाजपच्या नगरसेविका प्रियंका बारसे यांनी या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने त्याची वेगळीच चर्चा झाली. या भागातील भाजपचे दोन नगरसेवक राष्ट्रवादीच्या मार्गावर आहेत. त्यांनी ते जाहिररित्या सुचितही केले आहे. त्यात बारसे यांनी राष्ट्रवादीच्या कार्यक्रमाला हजेरी लावल्याने त्या ही कमळ सोडून हातावर घड्याळ बांधणार का अशी चर्चा लगेच सुरु झाली. मात्र, त्या चर्चेला त्यांनी लगेच ब्रेक लावला. माझ्या प्रभागातला हा सोहळा होता. त्यात माझ्या मतदार बंधू-भगिंनीना पंतप्रधान जनआरोग्य योजनेची कार्ड मिळणार होती. त्यामुळे मी उपस्थित राहणे स्वाभाविक होते, असे बारसे म्हणाल्या. तर, भोसरीचे माजी आमदार व राष्ट्रवादीचे शहरातील ज्येष्ठ नेते विलास लांडे-पाटील हे कोल्हेंच्या या सोहळ्याला गैरहजर राहिल्याने चर्चेला आणखी उधाण आले. मात्र, आपण शहराबाहेर साताऱ्याला होतो. त्यामुळे आपला नगरसेवक मुलगा विक्रांत या कार्यक्रमाला हजर होता. असे लांडे यांनी स्पष्ट केल्याने या चर्चेलाही पूर्णविराम मिळाला. तसेच विक्रांत व अजित हे दोघेही मला सारखेच असल्याचे त्यांनी सांगितले.

दुर्गे यांनी या कार्यक्रमावरून कोल्हेंना लक्ष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्यांसाठी सुरू केलेल्या महत्त्वाकांक्षी ''प्रधानमंत्री जन आरोग्य'' योजनेचे ओळखपत्र वाटप करुन कोल्हे प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करीत आहेत, असा हल्लाबोल त्यांनी केला. केंद्र सरकारच्या पुढाकाराने संपूर्ण देशात मोफत कोविड प्रतिबंधक लस दिली जात आहे. मात्र, आपल्या शिरूर मतदारसंघात पाच लाख लस मोफत देवून स्वत:ची पाठ थोपटून घेणारे कोल्हे लस प्रमाणपत्रावर मोदींचा फोटो नको, अशी मागणी संसदेत करतात. मोदींच्या योजनांचा स्वत:च्या प्रसिद्धीसाठी वापर करायचा आणि दुसरीकडे संसदेत टीका-टिप्पण्णी करायची, अशी दुटप्पी भूमिका त्यांना शोभणारी नाही. कोरोना काळात देशात झालेल्या मृत्युंना पंतप्रधान मोदी जबाबदार आहेत, अशी टीका त्यांनी केली. मग, त्यांच्या मतदारसंघात कोरोनामुळे झालेल्या मृत्युंना जबाबदार ते आहेत का? अशी तिरकस विचारणाही त्यांनी केली.

Amol Kolhe
आमदार रोहित पवार यांची मंत्रीमंडळात वर्णी?

नगरसेवक गव्हाणे हे राजकारणाच्या पलीकडे जाऊन समाजाचे हित डोळ्यासमोर ठेऊन काम करतात, असे कोल्हेंनी गौरोद्वगार या वेळी काढले. कोरोनाच्या नियमांचे पालन या वेळी करण्यात आले. स्वच्छतेबाबत नागरिकांना शपथ देण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. तसेच कोरोनाने मृत्यू पावलेल्यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com