राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या भट्टीतून तयार झालेलं रसायन! सदाभाऊंनी केलं कौतुक

मनसे प्रमुख राज ठाकरेंच्या औरंगाबादमधील सभेमुळं तापलं राजकीय वातावरण
राज ठाकरे हे बाळासाहेबांच्या भट्टीतून तयार झालेलं रसायन! सदाभाऊंनी केलं कौतुक
Sadabhau KhotSarkarnama

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची 1 मे रोजी औरंगाबादमध्ये मराठवाडा सांस्कृतिक मंडळावर जाहीर सभा होणार आहे. या सभेमुळं राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या सभेसाठी राज ठाकरे हे पुण्यातून औरंगाबादकडे रवाना झाले आहेत. याचवेळी भाजप नेत्यांकडून राज ठाकरेंच्या कौतुकाची मालिका सुरू आहे. यात सदाभाऊ खोतही (Sadabhau Khot) सहभागी झाले असून, त्यांनीही तोंडभरून कौतुक केलं आहे.

जागर शेतकऱ्यांचा, आक्रोश महाराष्ट्राचा या अभियानावा आजपासून रत्नागिरी जिल्ह्यात सुरवात झाली. या वेळी सदाभाऊ खोत यांनी राज्य सरकारवर टीकेची झोड उठवली. त्याचेवळी राज ठाकरेंची मात्र, त्यांनी स्तुती केली. ते म्हणाले की, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भट्टीतून तयार झालेलं राज ठाकरे हे रसायन आहे. हिंदुत्वाला फुंकर घालण्याचं काम राज ठाकरेंनी केलं आहे त्याच्या ज्वाला आता भडकल्या आहेत. या ज्वालामध्ये को भस्म होतं हे आपल्याला भविष्यात दिसेल.

Sadabhau Khot
योगी व्हायला बायकोला सोडाव लागंत पण..? दिपाली सय्यद यांचा थेट सवाल

राज ठाकरेंचे आगमन झाल्यानंतर त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. त्यांच्या गाड्यांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. तसेच, शंभर पुरोहितांकडून मंत्रपठण करण्यात आले. राज ठाकरेंना पुढील कार्यात यश लाभो, यासाठी पुरोहितांकडून पूजाही करण्यात आली. यानंतर राज ठाकरे हे वढू येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधीस्थळी रवाना झाले. तिथे दर्शन घेऊन ते पुढे औरंगाबादला रवाना झाले. राज ठाकरे यांच्यासोबत भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेंगडे, मिलिंद एकबोटे हे होते. वढू येथे मनसे कार्यकर्ते आणि भाजपचे कार्यकर्तेही मोठ्या संख्येने दाखल झाले होते.

राज ठाकरेंच्या सभेला अयोध्येतील हिंदुत्ववादी संघटनांनी पाठिंबा दिला आहे. यामुळे या सभेसाठी सुमारे अडीच हजार हिंदुत्ववादी कार्यकर्ते औरंगाबादमध्ये दाखल होणार आहेत, अशी माहिती मनसेचे नेते दिलीप धोत्रे यांनी दिली आहे. दरम्यान, परवानगी मिळाली नाही तरी सभा घेण्यावर मनसे ठाम असल्याने पोलिसांनी देखील संघर्ष टाळत संयमाची भूमिका घेतली होती. अखेर पोलीस आयुक्त डाॅ. निखिल गुप्ता यांनी 16 अटींसह या सभेला परवानगी दिली आहे.

Sadabhau Khot
राज ठाकरेंच्या दौऱ्यात कुठंच न दिसलेले वसंत मोरे अखेर प्रकटले अन् म्हणाले...

राज ठाकरे यांची सभा 1 मे म्हणजेच महाराष्ट्रदिनी होत आहे. 3 मे रोजी रमजान सण असल्याने या सभेतून कुठल्याही प्रकारचे वादग्रस्त वक्तव्य केले जाऊ नये, याकडे पोलिसांनी लक्ष्य केंद्रित केले आहे. सभेला काही कडक अटी-शर्ती घालूनच परवानगी देण्यात आली आहे. असे असले तरी कुठलाही अनुचित प्रकार सभेदरम्यान किंवा त्यानंतर घडू नये, यासाठी पोलिसांनी देखील कंबर कसली आहे. या सभेच्या बंदोबस्तासाठी 8 पोलीस उपायुक्तांसह अन्य अधिकारी व दोन हजार पोलीस कर्मचारी असा प्रचंड फौजफाटा तैनात करण्यात येणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.