बैलांनाही खेळावसं वाटतं; शर्यतींना विदेशातून लगाम घालण्याचा प्रयत्न! जावडेकरांचा दावा

भोसरीत देशातील सर्वांत मोठी बैलगाडा शर्यत...
BJP Leader Prakash Javadekar Latest Marathi News
BJP Leader Prakash Javadekar Latest Marathi News Sarkarnama

पिंपरी : बैलगाडा शर्यत हे भारताचे सांस्कृतिक वैभव आहे. त्याला लगाम घालण्याचा प्रयत्न देशातील आणि विदेशातील काही शक्ती करीत आहेत, असा दावा माजी केंद्रीय मंत्री आणि भाजप नेते प्रकाश जावडेकर यांनी रविवारी (ता.२९) पिंपरी-चिंचवडमध्ये भोसरीत केला. त्यांचा रोख हा या शर्यतीला न्यायालयात आव्हान देणारे प्राणीप्रेमी व त्यांच्या संघटनांकडे होता. ते एकही बैल पाळत नसल्याची कोपरखळीही त्यांनी मारली. (Prakash Javadekar Latest Marathi News)

बैलगाडा शर्यत सुरु होण्यासाठी आपण अध्यादेश काढला व तो न्यायालयात टिकलाही, असे जावडेकर म्हणाले. ही संस्कृती टिकली पाहिजे, जोपासली पाहिजे, त्यासाठी शर्यतीच्या अटी आणि न्यायालयाच्या नियमांचेही पालन केले पाहिजे, असे ते म्हणाले. (Bullock Cart Race in Bhosari)

BJP Leader Prakash Javadekar Latest Marathi News
बिल्डरला सव्वानऊ कोटी रुपयांची खंडणी मागणाऱ्या पीएचडी धारकाला बेड्या

भोसरीचे भाजप आमदार महेश लांडगे यांच्या पुढाकाराने पिंपरी-चिंचवडचे माजी महापौर राहुल जाधव व नितीन काळजे यांनी टाळगाव चिखली येथील रामायण मैदानावर भरविलेल्या देशातील सर्वांत मोठ्या बैलगाडा शर्यतीला भेट दिली त्यानंतर जावडेकर बोलत होते. त्यांनी व राज्याचे माजी मंत्री सदाभाऊ खोत यांनी पाच दिवस चालणाऱ्या या शर्यतीला तिसऱ्या दिवशी (रविवारी)भेट दिली.

प्राण्यांना धावायचं नसतं, त्याला शर्यत आवडत नाही, हे तुम्हाला कुठल्या बैलाने लिहून दिलंय, असा टोला जावडेकरांनी बैलगाडा शर्यतींना विरोध करणाऱ्यांना लगावला. माणसं खेळतात, प्राणी खेळतात, मग बैलाला खेळावसं वाटलं तर त्यात बिघडलं कुठं, असे ते म्हणाले.

BJP Leader Prakash Javadekar Latest Marathi News
IPS कृष्णप्रकाश यांच्यावर कारवाई होणार का? वळसे पाटलांनी स्पष्टचं सांगितलं

गोवंश वाचला पाहिजे म्हणून महाराष्ट्राचे सुपूत्र जावडेकर दिल्लीच्या तख्तावर सह्याद्रीसारखे शेतकऱ्यांच्या पाठिशी उभा राहिले. दुसऱ्या बाजुला बैलगाडा शर्यतींवर बंदी आल्यानंतर महेश लांडगे यांनी श्रम घेतले. विधानसभा सभागृहात विधेयक आणले आणि शर्यतींवरील बंदी उठली, असा दावा खोत यांनी केला. लांडगेंसारख्या ढाण्या वाघाने शेतकऱ्यांना न्याय मिळवून दिला. एव्हढेच नव्हे, तर देशातील सर्वात मोठी बैलगाडा शर्यत भरवून शेतकऱ्यांचा खऱ्या अर्थाने सन्मान केला, अशा शब्दांत त्यांनी कौतूक केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com