BJP Leaders' Sad Demise : भाजपवर आघात ; तीन महिन्यात 'ताई', दोन 'भाऊ' गमावले..

BJP Leaders Passed Away in Last Three Months: बापट यांचे पार्थिव दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत त्यांच्या शनिवार पेठेतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे.
Mukta Tilak - MP Girish Bapat - Laman Jagtap
Mukta Tilak - MP Girish Bapat - Laman JagtapSarkarnama

Pune BJP News: खासदार गिरीश बापट यांचे आज (बुधवारी) निधन झाले. त्यांच्या निधनाने भाजपवर शोककळा पसरली आहे. गेल्या तीन महिन्यात पुणे जिल्ह्यात भाजपने तीन लोकप्रतिनिधी गमावले आहेत.

आमदार मुक्ताताई टिळक, आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनानंतर तीन महिन्यातच बापट यांच्या निधनाने भाजपमध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे.

Mukta Tilak - MP Girish Bapat - Laman Jagtap
Girish Bapat Passed Away: पुण्याचे खासदार गिरीश बापट यांचं निधन

या तीनही नेत्यांचे गंभीर आजाराने निधन झाले. मुक्ता टिळक या 'ताई',तर लक्ष्मण जगताप, गिरीश बापट हे 'भाऊ' नावानं जनसामान्यांमध्ये प्रसिद्ध होते. या तिघांचा भाजपचे कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्यासह मतदारसंघातील जनतेशी जवळचा संपर्क होता.

मुक्ता टिळक या बऱ्याच दिवसांपासून कर्करोगाशी झुंज देत होत्या. गेल्या 22 डिसेंबर रोजी त्यांची प्राणज्योत मालवली. तर लक्ष्मण जगताप यांचे तीन जानेवारी रोजी निधन झाले.

Mukta Tilak - MP Girish Bapat - Laman Jagtap
Girish Bapat Passes Away : गिरीश बापटांच्या आठवणीने उल्हास पवारांना अश्रू अनावर

जगताप यांची गेल्या तीन वर्षांपासून कर्करोगाशी झुंज देत होते. गिरीश बापट यांचेही आज प्रदीर्घ आजारामुळे निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून असा परिवार आहे.

बापट यांचे पार्थिव दुपारी २ ते ६ वाजेपर्यंत त्यांच्या शनिवार पेठेतील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. आज सांयकाळी सात वाजता त्यांच्यावर शासकीय इतमामात वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार असल्याचे भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांनी सांगितले.

Mukta Tilak - MP Girish Bapat - Laman Jagtap
Girish Bapat News: पण नियतीला ते मान्य नव्हतं..; गिरीश बापटांच्या निधनानंतर अंकुश काकडे अक्षरश: रडू लागले

पुण्याच्या राजकारणात ‘भाऊ’ म्हणून ओळखले जाणारे गिरीश बापट यांच्यावर गेल्या काही दिवसांपासून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना श्वसनाचा त्रास होता.

सर्वपक्षीय राजकीय नेते मंडळींनी रुग्णालयात जाऊन त्यांच्या भेटी घेतल्या होत्या.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आदींनी रुग्णालयात जाऊन बापट यांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. नुकत्याच झालेल्या कसबा विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com