उद्धव ठाकरे तुमच्या मुलाला सांभाळा...

Kirit Somaiya : उद्धव ठाकरे यांचा उजवा हात जेलमध्ये गेला आता डावाही जाईल.
Kirit Somaiya & Uddhav Thackeray Political News Marathi
Kirit Somaiya & Uddhav Thackeray Political News Marathisarkarnama

पुणे : महाराष्ट्रातील उद्धव ठाकरे यांचे अमंगल सरकार कायम स्वरूपी गेले आहे. आता स्वयं एकनाथ आणि देवेंद्र हे आता महाराष्ट्रात मंगलमय जीवन आणतील. तसेच ठाकरे यांचा उजवा हात जेलमध्ये गेला आता डावा हातही जेलमध्ये जाईल. उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) तुमच्या मुलाला सांभाळा,अशा शब्दात भाजपचे नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी टीका केली.

त्यांनी पुण्यातील मानाच्या गणपतीसह इतर मंडळांच्या गणपतीचे दर्शन घेतले. त्यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यावेळी उपस्थित होते. (Kirit Somaiya & Uddhav Thackeray Political News Marathi)

Kirit Somaiya & Uddhav Thackeray Political News Marathi
पंकजा मुंडेंच्या मनात काय चाललयं?,अमित शहांच्या बहुचर्चित दौऱ्यापासून दुरच!

सोमय्यांनी मानाचा पहिला कसबा गणपतीचे दर्शन घेतले. गेले अडीच वर्षाच महाराष्ट्र मागे गेला त्याला पुन्हा विकासाच्या पथावर न्यावे, अशी त्यांनी प्रार्थना केली. ज्या दिवशी ठाकरे सरकार गेले त्या दिवशी महाराष्ट्रावरील अमंगल संपले आता स्वयं एकनाथ व देवेंद्र हे दोघे महाराष्ट्राचे मंगल करतील, अशा शब्दात सोमय्यांनी ठाकरेंवर निशाणा साधला.

Kirit Somaiya & Uddhav Thackeray Political News Marathi
शिवसंग्राम संघटना दिशाहीन होणार नाही : ज्योती मेटे

आज दुपारी मुंबई महापालिकेने आदित्य ठाकरे, अस्लम भाई यांनी केलेल्या १ हजार कोटीच्या भ्रष्टाचाराची चौकशी करण्याची घोषणा केली आहे. पर्यावरण मंत्रालयाने एक हजार कोटीचा घोटाळा केला आहे. मड आयलंड येथील रिसॉर्टला २१ फेब्रुवारी २०२१ ला पर्यावरण विभागाने तात्पुरती परवानगी दिली व त्यानंतर महापालिकेतील सत्ताधाऱ्यांनी ही परवानी २०२५ पर्यंत वाढवून दिली. मी याचा पुरावा दिला आहे. व पुरावा दिल्यानंतर काय होते हे संजय राऊत यांना विचारा, असा टोला देखील सोमय्यांनी लगावला. आता सोमय्यांच्या टीकेवर शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in