अजित पवारांनी राजीनामा द्यावा; किरीट सोमय्यांचे पुन्हा गंभीर आरोप

या कारखान्याच्या व्यव्हारात राज्य सरकारचा पैसा आहे.
अजित पवारांनी राजीनामा द्यावा; किरीट सोमय्यांचे पुन्हा गंभीर आरोप
ajit pawar, kirit somaiyasarkarnama

पुणे : भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. जरंडेश्वर साखर कारखान्याचे मूळ मालक हे अजित पवारच असल्याचा दावा सोमय्या यांनी केला. त्यासाठी सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत काही कागदपत्रेही दाखवली. सोमय्या यांनी आज (ता. १३ ऑक्टोबर) पुण्यात पत्रकार परिषद घेत अजित पवार यांच्यावर विविध आरोप केले.

ajit pawar, kirit somaiya
हर्षवर्धन पाटील यांना शांत झोप लागते...यावर शरद पवार म्हणतात...

सोमय्या म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाने आपल्या निर्णयात स्पष्ट म्हटले आहे की जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी विक्रीत घोटाळा झाला आहे. त्याची चौकशी झाली पाहिजे, असा आदेश इकॉनॉमिक ऑफेन्स विंग ऑफ महाराष्ट्र पोलिस आणि ईडीला दिले आहेत. जरंडेश्वर साखर कारखाना जेव्हा घेतला तेव्हा पवार उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे सर्वेसर्वा होते. या कारखान्याच्या व्यव्हारात राज्य सरकारचा पैसा आहे, असा गंभीर आरोप सोमय्या यांनी केला.

ajit pawar, kirit somaiya
खुद्द पवारांचाच वानखेडेंवर हल्ला... त्यांची कोणाशी संगत आहे, याचा संशय येतोय!

अजित पवार यांनी स्वत: त्या कारखान्याची विक्री केली, लिलाव केला व स्वत:च स्वत:च्या कंपनीला घेतला. सगळ्या गोष्टींचे उल्लंघन झाले आहे. कारखाना स्वत: घेतला तोही बेनामी घेतला. त्यामुळे त्यांना पदावर राहता येणार नाही, त्यामुळे अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणी सोमय्या यांनी केली. नेटफ्लिक्स ने सिरीज करायची ठरवली तर या साऱ्या प्रकरणावर अजित पवार यांना दोन चारशे कोटी रुपयांची रॉयल्टी मिळू शकेल, असा टोलाही सोमय्या यांनी लगावला आहे. अजित पवारांचे आर्थिक व्यवहार अनेक कंपन्यांमध्ये आहेत. त्यातील एका कंपनीचे नाव आहे यश व्ही ज्व्लेस. ही कंपनी शेल कंपनी आहे, असा आरोपही सोमय्या यांनी केला आहे. ही 23 एप्रिल 2009 रोजी सेबीने प्रतिबंधित केलेली शेल कंपनी आहे. या कंपनीमधून ठाकरे सरकारमधील तीन मंत्री, नेत्यांचे मनी लॉन्ड्रिंगचे रेकॉर्ड माझ्याकडे आलेले आहेत, असा गोप्यस्पोट सोमय्या यांनी केला.

Related Stories

No stories found.