शंभर गुन्हे दाखल झाले तरी घाबरत नाही; राष्ट्रवादीची गुंडगिरी संपवणार

बालगंधर्व रंगमंदिरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंडी आणि शाईच्या बाटल्या घेऊन आले होते.
 Jagdish Mulik-Prashant Jagtap Latest Marathi News
Jagdish Mulik-Prashant Jagtap Latest Marathi NewsSarkarnama

पुणे : पुणे शहरात (Pune) राष्ट्रवादी कॉंग्रेसचे कार्यकर्ते गुंडगिरी करीत असून, त्यांच्यावर पोलिसांचा आणि सरकारचा अंकुश राहिलेला नाही. शहराची संस्कृती बुडविण्याचे पाप करणाऱ्या राष्ट्रवादीची गुंडगिरी संपवणार असल्याचा इशारा भाजपचे (BJP) शहर अध्यक्ष जगदीश मुळीक (Jagdish Mulik) यांनी दिला.

राष्ट्रवादीच्या (NCP) गुंडगिरीचा निषेध करण्यासाठी शहर भाजपच्या वतीने आज (ता.18 मे) अलका टॉकिज चौकात मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले. या वेळी ते बोलत होते. यावेळी प्रदेश चिटणीस धीरज घाटे, शहर सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दत्ता खाडे, दीपक नागपुरे, दीपक पोटे, संदीप लोणकर यांची प्रमुख उपस्थिती होते. (Jagdish Mulik-Prashant Jagtap Latest Marathi News)

 Jagdish Mulik-Prashant Jagtap Latest Marathi News
आम्ही चवन्नी छाप, भाडोत्री लोक ठेवणार नाही; तर देश घडवणारी टीम तयार करू...

मुळीक म्हणाले, सोमवारी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani) यांच्या कार्यक्रमात घुसून त्यांच्यावर हल्ला करण्याचा नियोजनबद्ध कट राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आखला होता. त्याप्रमाणे सेनापती बापट रस्त्यावरील चौकात आंदोलन करणारे हॉटेल मेरियेटच्या प्रवेशद्वारातून आत पोहोचले. त्यांची गाडी अडविण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या सुरक्षा रक्षकांच्या गाडीवर आक्रमण केले. बालगंधर्व रंगमंदिरात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अंडी आणि शाईच्या बाटल्या घेऊन आले होते, असा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान या गुंडांवर कोणतेही गंभीर गुन्हे दाखल झालेले नाहीत. उलट भाजप कार्यकर्त्यांवर विनयभंगासारखे गंभी गुन्हे दाखल करण्यात आले. हे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत आणि राष्ट्रवादीच्या गुंडांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी मुळीकांनी केली आहे.

 Jagdish Mulik-Prashant Jagtap Latest Marathi News
स्मृती इराणींच्या विरोधात आंदोलन महागात! रुपाली पाटलांसह राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे

ते म्हणाले, राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भाजपच्या पदाधिकार्यांवर हल्ले करीत आहेत. नागरिकांना दमदाटी करीत आहेत. ठिकठिकाणी हप्ते वसुल करीत आहेत. त्यांच्या विरोधात जे आवाज उठवतील त्यांची पोलिसांच्या मदतीने गंभीर गुन्हे दाखल केले जात आहे. अशा गळचेपीला भाजपचे कार्यकर्ते घाबरत आहेत. शंभर गुन्हे दाखल झाले तरी आम्ही घाबरत नाही. गुंडगिरी विरोधातील आमचा लढा सुरूच राहील.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com