हर्षवर्धन पाटील राष्ट्रवादीच्या मदतीची परतफेड करणार का?

राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे-माजी मंत्री हर्षवर्धन पाटील या दोघांच्याही राजकीय संषर्घात हा गट महत्वाचा मानला जातो.
Ajit Pawar-DattatrayBharane-HarshvardhanPatil
Ajit Pawar-DattatrayBharane-HarshvardhanPatilSarkarnama

वालचंदनगर (जि. पुणे) : इंदापूर आणि बारामती तालुक्याच्या सीमेवर असलेल्या छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीमध्ये भाजपचे नेते, माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील पॅनेल उभे करणार की कर्मयोगीच्या निवडणुकीत राष्ट्रवादीने केलेल्या मदतीची परतफेड करणार?, याकडे इंदापूर तालुक्यासह संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. (BJP leader Harshvardhan Patil Will contest Chhatrapati Sugar Factory elections?)

इंदापूर तालुक्यातील कर्मयोगी व बारामती तालुक्यातील सोमेश्‍वर सहकारी साखर कारखान्यांची पंचवार्षिक निवडणूक नुकतीच पार पडली. येत्या काही दिवसांत भवानीनगर येथील श्री छत्रपती सहकारी साखर कारखान्याची पंचवार्षिक निवडणूक होणार आहे. छत्रपती कारखान्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाची एकहाती सत्ता आहे. छत्रपती कारखान्याचे कार्यक्षेत्र बारामती व इंदापूर तालुक्यातील ५३ गावांमध्ये असून सुमारे ३० हजार सभासदांचा प्रपंच या कारखान्यावर चालतो. त्यामुळे दोन्ही तालुक्याच्या दृष्टीने या कारखान्याच्या निवडणुकीला महत्व आहे. तसेच, छत्रपती कारखान्याच्या कारभारात अजित पवार यांचे बारीक लक्ष असते. राज्यमंत्री दत्तात्रेय भरणे ह्यांचे होम पिचवर असलेला हा कारखाना असून तो राष्ट्रवादीच्या ताब्यात ठेवणे हे त्यांच्या दृष्टीने फायद्याचे ठरणार आहे.

Ajit Pawar-DattatrayBharane-HarshvardhanPatil
वाळू व्यावसायिकाचा गोळ्या झाडून खून; प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात हल्लेखोरही ठार

कर्मयोगी सहकारी साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध करण्यामध्ये इंदापूर तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचा मोलाचा वाटा राहिला आहे. कारण, पाटील यांनी केलेल्या आवाहनानुसार राष्ट्रवादीने या निवडणुकीत पॅनेल उभे केले नव्हते. त्यावेळी पक्षावर टीकाही झाली होती. मात्र, अडचणीत सहकारी कारखान्यांवर आणखी आर्थिक बोझा नको; म्हणून पक्षाने ही निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतला आहे, असे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी त्यावेळी जाहीर केले होते.

Ajit Pawar-DattatrayBharane-HarshvardhanPatil
जो आडवा येईल, त्याला तुडवायचा, हेच माझे धोरण

छत्रपती कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सणसर-लासुर्णे जिल्हा परिषदेचे गट हा पूर्वी हर्षवर्धन पाटलांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जात होता. या गटामध्ये पाटील यांचा दांडगा जनसंपर्क आहे. या गटातून पाटील यांना ५ हजारांचे मताधिक्य मिळत होते. मात्र २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये सणसर-लासुर्णे जिल्हा परिषद गटातील मतदारांनी पाटील यांना झटका देवून राज्यमंत्री भरणे यांना १००० पेक्षा जास्त मतांचे लीड दिले होते. या गटातील मताधिक्यामुळे भरणे यांचा विजय व पाटील यांचा पराभव झाला होता. त्यामुळे दोघांच्याही राजकीय संषर्घात हा गट महत्वाचा मानला जातो.

Ajit Pawar-DattatrayBharane-HarshvardhanPatil
अशोक पवारांनी आत्मचिंतन, तर धारिवालांनी खुलासा करावा : धमकीच्या पत्रावर शिवसेनेची मागणी

दुसरीकडे, बारामती तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाची तेवढी तादकद नसतानाही निवडणूक लढवली होती. विधानसभेच्या २०१९ च्या निवडणूकीपूर्वी माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी भाजपत प्रवेश केल्याने तालुक्यात भाजप मोठा झाला आहे. केंद्रातील बडे मंत्री व राज्यातील भाजप नेत्याशी पाटील यांचे सलोख्याचे संबंध आहेत. त्यामुळे छत्रपतीच्या निवडणुकीमध्ये पॅनेल उभे करून हर्षवर्धन पाटील आपली ताकद दाखवणार का? असा प्रश्न या निमित्ताने चर्चिला जात आहे.

जाचक, घोलप बंधूंच्या भूमिकेकडे लक्ष

श्री छत्रपती कारखान्याच्या निवडणुकीमध्ये कारखान्याचे माजी अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, माजी अध्यक्ष अविनाश घोलप, माजी अध्यक्ष बाळासाहेब घोलप यांचीही भूमिका महत्वाची ठरणार आहे. कारण, कारखान्याच्या कार्यक्षेत्रात त्यांची बऱ्यापैकी ताकद आहे. जाचक व घोलप बंधूू सत्ताधारी पॅनेलमधून निवडणूक लढविणार की स्वतंत्र पॅनेल करणार, याची उत्सुकता मतदारांना लागली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com