प्रश्न विचारायला नाही सोडवायला अक्कल लागते; चित्रा वाघांचा मुख्यमंत्र्यांना टोला

इंदापूर (Indapur) तालूक्यात दोन दिवसांपूर्वी एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या (Suicide) केल्यानंतर भाजप नेत्या चित्रा वाघांनी (Chitra wagh) राज्य सरकारवर तोफ डागली आहे.
Chitra Wagh
Chitra Wagh Sarkarnama

पुणे : टवाळखोर मुलांकडून होणाऱ्या त्रासाला कंटाळून इंदापूर (Indapur) तालूक्यातील बोरी गावातील १५ वर्षांच्या अल्पवयीन विद्यार्थीनींने गळफास घेऊन आत्महत्या (Suicide) केल्याची धक्कादायक घटना दोन दिवसांपूर्वी घडली. या घटनांनंतर पुन्हा एकदा महिला संरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हाच धागा पकडत भाजपच्या (BJP) महिला प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ (Chintra wagh) यांनी राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. (Pune crime news update)

इंदापूर तालूक्यातील सिद्धी भिटे आणि मालेगावातील आशिया या दोन मुलींच्या आत्महत्येला स्थानिक पोलिस प्रशासनासह राज्यसरकारवरही त्यांनी टीका केली. दोन दिवसांपूर्वी इंदापूर तालूक्यातील सिद्धी भिटे या १५ वर्षाच्या तरुणीने आत्महत्या केली, त्याआधी फक्त फॅशनेबल कपडे वापरते म्हणून मालेगाव येथील आशिया नावाच्या अल्पवयीन मुलीनेही आत्महत्या केल्याची घटना घडली. या दोन्ही घटनांमध्ये जर स्थानिक पोलीसांनी लक्ष दिले असते तर या मुलींचे जीव वाचले असते. आणि समाजाने साथ दिली असती तर मुलींचा विश्वास वाढला असता.

Chitra Wagh
भाजप नेत्यांना पक्षात प्रवेश नाही! अखिलेश यादवांची मोठी घोषणा

शुक्रवारी ( १४ जानेवारी) अनेक दिवसांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडीओ कॉन्फसिंग च्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. पंचवीस हजार महिला राज्यातून गायब झालेल्या असताना, रोज राज्यातील महिला मुली टवाळखोर मुलांच्या छेडछाडीला कंटाळून आत्महत्या करत असताना मुख्यमंत्री मात्र फक्त डायलॉगबाजी करुन निघून गेले, असे सांगत, मुख्यमंत्री साहेब, प्रश्न विचारायला नाही तर प्रश्न सोडवायला अक्कल लागते. असे म्हणत चित्रा वाघांनी राज्य सरकारवर तोफ डागली आहे.

गेल्या दोन वर्षात राज्य सरकारने वसुली गोळा करण्यात, बदल्यातली मलई खाण्यात, गांजाबहाद्दरांना वाचवण्यात आणि गुन्हेगारांना पाठीशी घालण्यातच ही अक्कल वापरली आहे. आता राज्य सरकारकडे थोडी जरी अक्कल शिल्लक असेल तर ती राज्यातील महिला मुलींच्या संरक्षणासाठी वापरा, अशी मागणी चित्रा वाघांनी राज्य सरकारवर टीकास्त्र डागले आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in