खलबतं सुरू आहेत..हा निव्वळ योगायोग नाही का? चित्रा वाघांना आधीच धोक्याचा अंदाज

चित्रा वाघ यांच्या विरोधात शिवसेना नेत्यानं कायदेशीर कारवाई सुरू केली आहे.
Chitra Wagh
Chitra Wagh Sarkarnama

पुणे : शिवसेना (Shivsena) नेते रघुनाथ कुचिक (Raghunath Kuchik) यांच्यावर हल्लाबोल करणाऱ्या भाजपच्या (BJP) महिला प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ (Chitra Wagh) आता अडचणीत आल्या आहेत. कुचिक यांच्यावर एका मुलीने बलात्काराचा आरोप केला होता. यावरून वाघ यांनी कुचिक यांच्या विरोधात आघाडी उघडली होती. नंतर त्या मुलीने वाघ यांच्या सांगण्यावरुन हे सगळे केल्याचा दावा केला आहे. यामुळे कुचिक यांनी आता वाघ यांना नोटीस बजावली आहे. यावर वाघ यांनी ट्विट करीत सरकारकडून त्यांच्यावर कारवाई होऊ शकते, असे संकेत आधीच दिले आहेत.

चित्रा वाघ यांनी ट्विटरवर म्हटले आहे की, शिवसेना नेता रघुनाथ कुचिक बलात्कार पीडितेने काल माझ्यावर आरोप केले की चित्रा वाघ यांनीचं हे सगळं घडवून आणलं.. आणि आज सकाळीचं कुचिकचे वकील हर्षद निंबाळकर यांची मला नोटीस आली तर दुसरीकडे चित्रा वाघ वर कसा गुन्हा दाखल करता येईल यावर खलबतं सुरू आहेत… हा सगळा निव्वळ योगायोग नाही का ?

Chitra Wagh
चित्रा वाघ अडचणीत! शिवसेना नेत्यानं बजावली कायदेशीर नोटीस

ज्येष्ठ वकील हर्षद निंबाळकर यांच्यामार्फत चित्रा वाघ ही नोटीस पाठवण्यात आली आहे. ही नोटीस दोन ते तीन दिवसांपूर्वी पाठवण्यात आली असून, ती आज सकाळी वाघ यांना मिळाली आहे. या नोटिशीत म्हटले आहे की, या गुन्ह्यात न्यायालयाकडून मला अटकपूर्व जामीन मंजूर झाला आहे. सध्या ही बाब न्यायप्रविष्ट असूनही चित्रा वाघ या माझी बदनामी करीत आहे. माझ्या अब्रुनुकसानीची नुकसानीची भरपाई त्यांनी द्यावी. याबाबत मी वाघ यांच्याविरोधात दिवाणी आणि फौजदारी दावा दाखल करणार आहे.

Chitra Wagh
तो मुलगा कुणाचा? गणेश नाईकांच्या 'डीएनए टेस्ट'साठी शिवसेना सरसावली

गुन्हा दाखल झाल्यानंतर वाघ यांनी कुचिक यांच्यावर निशाणा साधत त्यांच्याविरुद्ध आघाडी उघडली होती. कुचिक यांना या प्रकरणामध्ये जामीन मिळाल्यानंतरही वाघ यांनी आक्षेप घेतला होता. वाघ यांनी पुण्यातील भाजप कार्यालयात दोन वेळा पत्रकार परिषद घेऊन कुचिक यांच्यावर गंभीर आरोप केले होते. त्याचबरोबर कुचिक व संबंधित तरुणीमध्ये झालेले मोबाईल चॅटही त्यांनी उघड केले होते. कुचिक यांच्यासह पुणे पोलीस आणि महाविकास आघाडी सरकारवरही त्यांनी आरोप केले होते. त्या सर्व पार्श्वभूमीवर ही नोटीस पाठविण्यात आल्याचे ऍड. निंबाळकर यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com