शिवसेना ही शिंदेचीच, ठाकरे हा, तर गट ; बावनकुळेंनी शिवसेनेला डिवचलं

Chandrashekhar Bawankule : शिंदे गटाचे जेवढे लढतील, त्या सर्वांना निवडून आणण्याची जबाबदारी आमची
Chandrashekhar Bawankule latest news
Chandrashekhar Bawankule latest newssarkarnama

पिंपरी : भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) हे जीवघेण्या आजारातून उठलेले पक्षाचे चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांना भेटायला पिंपरी-चिंचवडमध्ये काल (बुधवारी) आले होते. यावेळी त्यांनी शिवसेना (shivsena)ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्याचा दावा माध्यमांशी बोलताना केला. तर, उद्धव ठाकरे हा गट असल्याचे ते म्हणाले. (Chandrashekhar Bawankule latest news)

राज्यातील सत्तासंघर्षाच्या पेचावर सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेल्या सुनावणीवर शहरात आलेले शालेय शिक्षणमंत्री शिवसेनेच्या शिंदे गटातील दिपक केसरकर यांनी भाष्य करणे योग्य नसल्याचे सांगितले होते. तसेच मत बावनकुळे यांनीही व्यक्त केले. या सुनावणीवर टिपण्णी करणार नाही, पण, न्यायालयाचा जो निर्णय येईल, तो सर्वांना मान्य असला पाहिजे, असे ते म्हणाले.

आमचं मिशन बारामती, मुंबई नाही, तर भाजप आणि शिंदेंची शिवसेना म्हणून पूर्ण ताकदीने कार्यकर्त्यांच्या भरवशावर लढणार असल्याचे त्यांनी सांगितले. शिवसैनिक शिंदेंनाच व त्यांच्या हिंदुत्वाच्या भुमिकेला समर्थन देत असल्याने शिवसेना ही त्यांचीच आहे, तर उद्धव ठाकरे हा गट आहे, असे ते म्हणाले.

Chandrashekhar Bawankule latest news
Eknath Shinde : शिंदेचं मुख्यमंत्रीपद धोक्यात ? : उल्हास बापट यांचा गौप्यस्फोट

शिंदे यांचे पूत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघावर (कल्याण) भाजपने दावा केला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भाजप मजबूत करणे म्हणजे शिंदेच्या उमेदवारांना त्रास देणे नाही, असा खुलासा त्यांनी केला. जे शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार असतील त्यांना मदत मिळावी म्हणून पक्ष मजबूत करीत आहोत, असे ते म्हणाले. शिंदे गटाचे जेवढे लढतील, त्या सर्वांना निवडून आणण्याची जबाबदारी आमची असल्याचे त्यांनी सांगितले.

भाजपच्या मिशन बारामतीचा काहीही परिणाम होणार नाही, असे प्रत्युत्तर राष्ट्रवादीचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड दिले आहे. त्यावर बोलताना २०२४ ला कोणाच्या पायाखालची वाळू सरकेल,कोण उध्वस्त होईल,हे दिसेलच, असे बावनकुळे म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मजबूत भारताच्या स्वप्नाला बारामतीकर साथ देतील,असे म्हणत २०२४ ला बारामतीतून भाजपचा उमेदवार निवडून येणार असल्याचे त्यांनी सूचित केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com