BJP-NCP Dispute :राजकारण तापलं : अजित पवारांच्या 'त्या' वक्तव्यावरुन भाजप आक्रमक

हिवाळी अधिवेशनात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले होते
BJP-NCP Dispute :
BJP-NCP Dispute :

Jalgaon News : छत्रपती संभाजी महाराज ‘धर्मवीर’नव्हे ‘स्वराज्यरक्षक’ होते, असे मत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी व्यक्त केले होते. हिवाळी अधिवेशनात बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले होते. आता या मुद्द्यावरुन भाजप (BJP) आक्रमक झाली आहे. अजित पवार यांच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाने त्यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध आंदोलन केले.

भारतीय जनता पक्षाचे आमदार सुरेश भोळे यांच्या नेतृत्वाखाली टॉवर चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी अजित पवार यांच्या निषेधार्थ घोषणाबाजी करण्यात आली. त्यांच्या प्रतिमेला जोडे मारण्यात आले. यावेळी बोलतांना आमदार सुरेश भोळे म्हणाले, की अजित पवार यांनी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नाही, ते फक्त ‘स्वराज्य रक्षक ’आहेत. असे वक्तव्य केले आहे.

BJP-NCP Dispute :
Shivsena : आता आक्रमक चेहरा करणार उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेतृत्व !

‘धर्मवीर’हा त्यांचा इतिहास आहे, विरोधी पक्षनेते अजितदादा यांनी इतिहास वाचावा, इतकी वर्ष छत्रपती संभाजी महाराज यांना धर्मवीर म्हटले जात आहे. हा इतिहास खोटा ठरविण्याचे काम पवार घराण्यांनी केलं आहे. मागच्या वेळीही शरद पवार यांनी छत्रपती शिवाजी महाराज हे ‘जाणता राजा’नाहीत असे वक्तव्य केले. इतिहासाबाबत बोलण्याचे अधिकार त्यांना कोणी दिले, भविष्यात जनता यांना माफ करणार नाही.

या आंदोलनात महिला आघाडीच्या पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यामोठ्या संख्येने उपस्थित होत्या. युवा आघाडीचे पदाधिकारी व कार्यकर्तेही उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com