पंकजा आमची मुलगीच, त्यांची काळजी घेण्यास भाजप समर्थ ; चंद्रकांतदादांचे राऊतांना प्रत्त्युतर

मी सामना वाचत नाही आणि सामनाची दखल देखील मी घेत नाही.
पंकजा आमची मुलगीच, त्यांची काळजी घेण्यास भाजप समर्थ ; चंद्रकांतदादांचे राऊतांना प्रत्त्युतर
Sanjay Raut. Chandrakant PatilSarkarnama

देहू (पुणे) : भाजपने विधान परिषद निवडणुकीत भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांना डावलले आहे, याबाबत आजच्या 'सामना'तून भाजपला टोमणे लगावले आहेत. यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत (sanjay raut) यांना प्रत्युत्तर दिले आहे. ते देहू येथे पत्रकारांशी बोलत होते. (chandrakant patil latest news)

चंद्रकांत पाटील म्हणाले, "पंकजा मुंडे यांची काळजी करायला भाजपा समर्थ असून मी सामना वाचत नाही आणि सामनाची दखल देखील मी घेत नाही, भाजप हे पंकजा मुंडे यांची काळजी घेण्यासाठी समर्थ आहेत. पंकजा मुंडे या पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपाच्या प्रत्येक नेत्याची मुलगी आहे. त्यामुळे त्यांची काळजी घ्यायला आम्ही समर्थ आहोत. बाकी कोणी त्यांची काळजी करण्याची गरज नाही,"

"गोपीनाथ मुंडे आणि शिवसेनेचे जवळचे संबंध होते. त्यामुळे पंकजा मुंडेंची आम्हाला चिंता वाटते, असा टोलाही संजय राऊतांनी भाजपला "सामना"तून लगावला आहे. विधान परिषद निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भाजपने पुन्हा डावलले. देवेंद्र फडणवीस यांना महाराष्ट्रात स्वतःची फळी उभी करायची आहे व त्या फळीत जुन्या निष्ठावान भाजप पदाधिकाऱ्यांना स्थान दिसत नाही. काँग्रेस, राष्ट्रवादी व अन्य पक्षांतून आलेल्यांची मोट बांधली. त्यांना राज्यसभेपासून विधान परिषदेपर्यंत उमेदवाऱ्या सहज मिळाल्या. सदाभाऊ खोत, पडळकर, लाड, बोंडे यांना उमेदवारी मिळते, पण खडसे यांना पक्ष सोडावा लागतो व मुंडे यांना अपमानित करून डावलले जाते, अशी टीका राऊतांनी भाजपवर केली.

Sanjay Raut. Chandrakant Patil
आमच्या हातात ईडी द्या, मग बघा, फडणवीसही शिवसेनेला मतदान करतील!

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या 14 तारखेला देहू येथे येत आहेत, यानिमित्ताने नरेंद्र मोदींचा फोटो हा विठ्ठलापेक्षा मोठा असलेले फलक लावण्यात आले आहे. यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष रविकांत वरपे यांनी आक्षेप घेतला आहे. यावर विचारलेल्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले, "कुठेतरी कार्यकर्ता उत्साहाने लावतो. एवढे मॉनिटर का केले जाते, माहिती नाही. राष्ट्रवादी काँग्रेसने बॅनर लावावे. त्यात विठ्ठलाचा फोटो मोठा लावावा आणि मोदींचा फोटो लहान लावावा किंवा लावू नये. संबंधित बॅनर हे पक्षाकडून लावण्यात आलेले नाहीत,"

Sanjay Raut. Chandrakant Patil
"भाऊ, तुमच्यामुळे मी परत खासदार झालो ! ; महाडीकांनी मानले जगतापांचे आभार

नरेंद्र मोदी १४ जून रोजी देहू दौऱ्यावर

पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ जून रोजी देहू दौऱ्यावर येणार आहेत. पंतप्रधानांच्या हस्ते जगतगुरु संत तुकाराम महाराज मूर्ती, शिळा मंदिराचा लोकार्पण सोहळा पार पडणार आहे. दोन वर्षानंतर सोहळ्याचे आयोजनयेत्या २० जूनपासून संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यास सुरुवात होणार आहे. गेल्या दोन वर्षापासून करोनामुळे हा सोहळा स्थगित करण्यात आला होता. यंदाच्या वर्षी या सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्यामुळे हा सोहळा उत्साहात पार पडणार आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in