Kasba By-Election : कसबापेठ, चिंचवडच्या उमेदवारीचा सस्पेन्स भाजपने वाढवला; पण...

Chandrakant Patil : ''चिंचवडसह कसब्याचा पक्षाचा उमेदवार हा दिल्लीत जाहीर होईल...''
Chandrakant Patil
Chandrakant PatilSarkarnama

पिंपरी : कसबा पेठ आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक लढविण्याचा महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) पवित्रा पाहून भाजपनेही आता ती लढण्याची तयारी सुरु केली आहे. त्याचवेळी ती बिनविरोध करण्यासाठीचे त्यांचे प्रयत्नही राहणार असून त्याकरिता उद्यापासून आघाडीच्या नेत्यांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेण्यात येणार आहे.

आघाडीने वरील दोन्ही जागा लढण्याची तयारी केली असली तरी राजकारणात शेवटच्या क्षणी काहीही होत असल्याने या दोन्ही ठिकाणची पोटनिवडणूक बिनविरोध होऊ शकते, अशी भविष्यवाणी पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी आज पिंपरीत वर्तवली. मात्र, निवडणूक झाली तर मागच्यापेक्षा अधिक मताधिक्याने ती जिंकण्यासाठी प्रयत्नांची शिकस्त केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Chandrakant Patil
Shashikant Shinde : कोरेगावात जनता, कार्यकर्त्यांची घुसमट; येणारा काळ राष्ट्रवादीचाच....

चिंचवड पोटनिवडणूक तयारी बैठकीनंतर ते पत्रकारपरिषदेत बोलत होते. निवडणुकीवरच प्रश्न विचारण्याची विनंती त्यांनी यावेळी केली. चिंचवडचे भाजपचे उमेदवार म्हणून नाव चर्चेत असलेले दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप (Laxman Jagtap) यांच्या पत्नी अश्वनी या त्यांच्या एका, तर बंधू शंकर जगताप हे दुसऱ्या बाजूला यावेळी बसलेले होते.

Chandrakant Patil
Old Pension Scheme : काँग्रेसने भाजपला घेरलं; जुनी पेन्शन योजना लागू करण्याची धमक होती तर...

चिंचवडची निवडणूक ही बिनविरोध करण्याची जबाबदारी भोसरीचे पिंपरी-चिंचवड अध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांच्यावर सोपविण्यात आली असून ते उद्यापासून आघाडीच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरु करणार आहेत.

दरम्यान, या नव्या जबाबदारीमुळे आ.लांडगेंचे कसब पणाला लागणार आहे. कारण निवडणूक लागली, तर ती गतवेळ म्हणजे २०१९ च्या ३८ हजार ४९८ या मताधिक्यापेक्षा अधिक मतांनी जिंकण्याचे आव्हान चंद्रकांतदादांनी त्यांना दिले आहे.

कसबा, चिंचवडच्या निवडणुकीचे प्रमुख म्हणून पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांच्या नावाची घोषणा यावेळी करण्यात आली. चिंचवडसह कसब्याचा पक्षाचा उमेदवार हा दिल्लीत जाहीर होईल, तत्पूर्वी प्रदेश कोअऱ कमिटी त्यासाठी इच्छूकांची नावे दिल्लीत पाठवेल, असे सांगत त्यांनी उमेदवारीचा सस्पेन्स कायम ठेवत आणखी वाढवला.

Chandrakant Patil
Jayant Patil News : आमच्या सरकारने घेतलेल्या निर्णयांमुळे आज बहुजनांची मुलं विदेशात शिकतायेत..

चिंचवडचा उमेदवार हा जगताप कुटुंबातीलच असेल, असे संकेत मात्र त्यांनी दिले. कारण दिवंगत आ.जगतापांच्या पत्नी आणि बंधूंचेच नाव पक्षाकडून उमेदवार म्हणून घेतले जात आहे. तर ही आग्रह धरण्याची वेळ नाही, अशी इतर इच्छूकांची समजूत आ.महेशदादा घालतील, असे चंद्रकांतदादांनी यावेळी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in