Kasaba By Election : आधी कोथरुड आता कसबा गृहीत धरणाऱ्यांना धडा शिकवा ; ब्राम्हण समाजाचा एल्गार

kasba peth by election poster war : "एकदा तरी धडा मिळू दे, निकाल वेगळा लागू दे,'
kasba peth by election poster war
kasba peth by election poster warsarkarnama

kasba peth by election poster war : भाजपने कसबा मतदारसंघात टिळक कुटुंबियांना तिकीट नाकारल्यानंतर ब्राम्हण समाजात नाराजी पसरली आहे. त्याचे पडसाद पुण्यात उमटण्यास सुरवात झाली आहे. पुण्यातील पेठांमध्ये नाराजीचा सुर उमटला आहे. ठिकठिकाणी बॅनर वॅार सुरु झाले आहे.

२४ ठिकाणी बॅनर

पुण्यात कसबा मतदार संघातून ब्राम्हण समाजाला उमेदवारी नाकरल्याने पुण्यात पोस्टर वॉर सुरू झाले आहे. शहरात तब्बल २४ ठिकाणी हे पोस्टर लावण्यात आल्याने चर्चांना उधाण आले आहे. दांडेकर पूल, मांगिरबाबा चौक, दत्तवाडी, अलका चौक, साहित्य परिषद, स प महाविद्यालय, महाराणा प्रताप उद्यान, विजय टॉकीज, मामलेदार कचेरी, लाल महल, फडके हौद, पवळे चौक आदी २४ ठिकाणी हे बॅनर लावण्यात आले आहेत.

kasba peth by election poster war
Ravindra Dhangekar : काँग्रेसकडून उमेदवारी निश्चित होताच धंगेकर टिळक कुटुंबियांच्या भेटीला..

आता नंबर बापटांचा का ?

'आधी कुलकर्णी यांचा मतदार संघ गेला, नंतर टिळकांचा गेला, तर आता नंबर बापटांचा का ? असा सवाल करत हा अन्याय समाज कूठपर्यन्त सहन करणार असा सवाल या पोस्टरच्या माध्यमातून विचारण्यात आला आहे.तर एका पॉडकास्टमध्ये भाजपवर जोरदार हल्लाबोल करण्यात आला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना यात लक्ष्य करण्यात आले आहे.

kasba peth by election poster war
Kasaba By Election : टिळकांना उमेदवारी देतो,..बिनविरोध करता का ? ; पटोलेंना चंद्रकांतदादांचे आवाहन ; "अजून २४ तास.."

"एकदा तरी धडा मिळू दे, निकाल वेगळा लागू दे,'

"जे कोथरुड मध्ये घडलं ते कसब्यात घडवलं जाते किंवा घडवून आणलं जात आहे. दोन्ही ठिकाणची परिस्थिती सारखीच असली तरी टार्गेट कुलकर्णी आणि टिळकच आहेत. नाना फडणवीसांची खेळी तेव्हाही खेळली गेली आणि आताही खेळली गेली आहे. त्यामुळे आधी कोथरुड आता कसबा गृहीत धरणाऱ्यांना मतपेटीत धडा शिकवा, असे म्हणण्याची आणि कृती करण्याची वेळ आली आहे," असे शेखर जोशी यांनी आपल्या पॉडकास्टमध्ये म्हटलं आहे. भाजपने घेतलेल्या या निर्णयावर त्यांनी निशाणा साधला आहे. "एकदा तरी धडा मिळू दे, निकाल वेगळा लागू दे,'असे आवाहन यात करण्यात आले आहे.

मेधा कुलकर्णी यांचा राजकीय बळी..

"चंद्रकांत पाटील यांना सुरक्षित मतदार संघ हवा म्हणून तेव्हा मेधा कुलकर्णी यांचा राजकीय बळी घेण्यात आला. चंद्रकांत पाटलांना इतके वर्ष कोल्हापूर मतदार संघ का बांधता आला नाही, हे त्यांचे आणि भाजपचं अपयशचं म्हणावं लागले.पाटलांना सुरक्षित मतदार संघ हवा होता, तर डोंबिवली मतदार संघपण होता. ते येथून निवडून आले असते. पण भाजपच्या चाणक्यांनी तसे केले नाही. डोंबिवलीतील रविंद्र चव्हाण ऐवजी तेव्हा कोथरुडच्या मेधा कुलकर्णी यांचा राजकीय बळी देण्यात आला. जो न्याय चिंचवड मतदार संघासाठी लावण्यात आला, तो न्याय कसबा मतदार संघात लावणं योग्य होते, असे यात म्हटलं आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com