भाजप पुन्हा आक्रमक; पटोलेंवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) वारंवार पंतप्रधानाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करत आहेत.
BJP demanded to file a case of treason against Nana Patel
BJP demanded to file a case of treason against Nana PatelSarkarnama

खेड : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra modi) यांच्याबाबत आक्षेपार्ह टिप्पणी प्रकरणी आज भाजपच्या वतीने काँग्रेस (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन करण्यात आले. भाजप नेते अतुल देशमुख यांच्या नेतृत्त्वात खेड तहसीलदार कार्यालयाबाहेर भाजपकडून (BJP) नाना पटोलेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडेमारो आंदोलन करण्यात आले. तसेच, पोलीस निरिक्षक आणि तहसिलदार यांना निवेदनही देण्यात आले.

गेल्या काही दिवसांपासून काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले वारंवार पंतप्रधानाविषयी आक्षेपार्ह टिप्पणी करत आहेत. त्यामुळे पटोले यांच्याकडून फक्त पंतप्रधानच नव्हे तर संपूर्ण देशाचा अपमान होत असल्याची भावना भाजपाकडून व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे नाना पटोंले यांच्यावर देशद्रोहाचे गुन्हा दाखल करण्याची मागणी भाजपकडून सातत्याने केली जात आहे.

BJP demanded to file a case of treason against Nana Patel
बुलेट ट्रेन फलटणमार्गे वळवण्यासह विमानसेवा सुरू करणार...

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी ‘मी मोदी यांना मारू शकतो’, ‘शिवी देऊ शकतो’, असं वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात मोठे वादळ उठलं होतं. आता पुन्हा एकदा नवा वाद पटोलेंनी ओढवून घेत ज्याची बायको पळून जाते, त्याचं नाव मोदी ठरतं असं बेताल वक्तव्य नाना पटोले केलं होतं. या वक्तव्याचा भाजपकडून जोरदार निषेध करण्यात आला.

साकोली विधानसभेच्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या विरोधात प्रचाराला आले होते. त्याचा राग ते अजूनही मनात धरून असल्याचे बोलले जात आहे. भंडारा जिल्ह्यात रविवारी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूक प्रचार करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आपल्या मतदार संघात निसटता पाय मजबूत करण्यासाठी विविध ठिकाणी सभा घेतल्या. सायंकाळी घेण्यात आलेल्या प्रचार सभेत नाना पटोले यांनी ‘मी मोदीला मारू शकतो व शिव्याही देऊ शकतो’ असे दादागिरी करणारे वक्तव्य केले आहे.

नाना पटोले यांच्या या वक्तव्यानंतर भाजपकडून सातत्याने त्यांच्याविरोधात प्रदर्शने केली जात आहेत. एका राष्ट्रीय पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांनी देशाच्या पंतप्रधानानबद्दल असे वक्तव्य करणे, हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला साजेसे नाही, अशा प्रतिक्रिया जनमानसात उमटत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com