सरकारनामाचे वृत्त खरे ठरले! भाजप नगरसेविका बारणेंनी दिला राजीनामा

Pimpri chinchwad Political news शहरातील भाजप नगरसेवकाचा गेल्या पंधरवड्यातील हा चौथा राजीनामा आहे.त्यात प्रथम राजीनामा दिलेल्या वसंत बोराटे यांनी दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीत प्रवेश केला.
Maya Barane/ BJP
Maya Barane/ BJPSarkarnama

पिंपरीः पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या (BJP) नगरसेविका माया बारणे (प्रभाग क्र.२४ क)या थोड्या वेळातच नगरसेवकपदाचा राजीनामा देणार असल्याचे वृत्त सरकारनामाने आज (ता.४) दुपारी दिले. त्यानंतर अर्ध्या तासातच त्यांनी तो पालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे दिला. भाजपच्या हुकूमशाही आणि भ्रष्ट कारभाराला कंटाळून तो दिल्याची तोफ त्यांनी डागली. नाव न घेता भाजपच्या स्थानिक नेत्यांवर म्हणजे शहर कारभारी भाजपच्या दोन्ही आमदारांवर त्यांनी यावेळी कडाडून हल्लाबोल केला.

शहरातील भाजप नगरसेवकाचा गेल्या पंधरवड्यातील हा चौथा राजीनामा आहे.त्यात प्रथम राजीनामा दिलेल्या वसंत बोराटे यांनी दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीत प्रवेश केला. तर, बारणे या ही त्यांचीच वाट चोखाळण्याची शक्यता आहे. कारण त्यांचे पती माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे यांनी अगोदरच भाजपातून राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे. नगरसेवकपदाची माया बारणेंची लागोपाठ ही दुसरी टर्म आहे. २०१२ ला त्या राष्ट्रवादीकडून पहिल्यांदा,तर गतवेळी भाजपकडून निवडून आल्या होत्या.मात्र,गेल्या पाच वर्षात कुठलेही महत्वाचे पद न मिळाल्याने त्या नाराज होत्या.परिणामी काही महिन्यांपासून त्यांनी भाजपच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणे थांबवले होते. त्यातून त्या पक्ष सोडणार असल्याचे संकेत मिळाले होते. अखेर त्यावर आज शिक्कामोर्तब झाले.

Maya Barane/ BJP
रासने यांनी केला विक्रम : स्थायी समितीच्या अध्यक्षपदी सलग चौथ्यांदा निवड

आशिया खंडात श्रीमंत पिंपरी महापालिका भाजप राजवटीत भ्रष्टाचारी म्हणून ओळखली जाऊ लागली.त्यामुळे शहराची बदनामी होत आहे,असा हल्लाबोल माया बारणे यांनी केला. शहरातील भाजप नेतृत्वावर कडाडून टीका करताना त्यांना हुजरेगिरी करणारे नगरसेवक हवेत.स्वावलंबी जनतेच्या प्रश्नावर आवाज उठविणारे नकोत, असे त्या म्हणाल्या.लाचखोरीत अटक झालेल्या स्थायी समिती अध्यक्ष तथा सभापतीविरुद्ध त्यांनी कारवाई केली नाही. उलट त्यांचे समर्थने केले.हे शहराचे दुर्दैव आहे.त्यातून भाजप पदाधिकारी भ्रष्टाचाराला साथ देतात,हे स्पष्ट झाले,अशी तोफ त्यांनी डागली. गत आर्थिक वर्षात भाजप पदाधिकाऱ्यांनी पालिकेच्या नागरवस्ती विभागातील ठेकेदार संस्थेला हाताशी धरून ५७ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केला आहे

वेस्ट टू एनर्जी प्रकल्प आणि स्मार्ट सिटीच्या कामातही भ्रष्टाचार केला.भाजपच्या दबावामुळे प्रशासनाने त्यावर कारवाई केली नाही.भामा आसखेड धरणातून त्यांना पाणी आणता आले नाही. परिणामी शहरात गेल्या चार वर्षापासून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. टॅंकरमाफियांना पोसण्यासाठी त्यांनी कृत्रिम पाणीटंचाई शहरात निर्माण केली,अशा आरोपांच्या फैरी त्यांनी झाडल्या. महापौर माई ऊर्फ उषा ढोरे यांच्यावरही त्यांनी टीका केली. लोकहितावर त्यांनी पालिका सभेत बोलू दिले नाही. त्यावरचे प्रश्न स्वीकारले नाहीत,असे बारणे म्हणाल्या.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com