BJP Mission 45: भाजपचे 'मिशन ४५'; शिरूर लोकसभा मतदारसंघात नड्डांच्या होणार दोन जाहीर सभा

J P Nadda News : भाजपने निवडणुकीचे रणशिंग फुंकले; जे पी नड्डा महिनाभरात पुन्हा महराष्ट्रात
j. p. nadda
j. p. nadda Sarkarnama

J P Nadda News : भाजपने देशात 'मिशन १४४'च्या तयारीला आज चंद्रपूरमधून सुरवात केली. त्या पार्श्वभूमीवरच नड्डा यांनी चंद्रपूर आणि औरंगाबादमध्ये सभा घेत महाविकास आघाडीवर जोरदार प्रहार केला. आता जे पी नड्डा हे महिनाभरात पुन्हा महराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. त्यामुळे भाजपने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे.

आज नड्डा यांनी चंद्रपूर आणि औरंगाबादचा दौरा केला. आता त्यांचा पुढचा महाराष्ट्र दौराही जाहीर करण्यात आला आहे. पुण्यातील शिरूर मतदार संघात आणि भोसरीत जे पी नड्डा यांची जाहीर सभा होणार आहे. याबाबतची माहिती भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी दिलीय.

शिरूर मतदार संघात सध्या राष्ट्रवादी (NCP) काँग्रेसचे अमोल कोल्हे (Dr. Amol Kolhe) हे खासदार आहेत. तर त्या आधीच्या पंचवार्षिक निवडणुकीत शिवसनेकडून शिवाजीराव आढळराव पाटील (ShivajiRao AdhalRao Patil) हे खासदार होते. त्यामुळे भाजपचा या मतदार संघात आजी आणि माजी खासदार देखील नाही. मात्र तरी देखील भाजप (BJP) शिरूर मतदार संघात आपली मोठी ताकद लावण्याचा प्रयत्न करत आहे.

j. p. nadda
J.P. Nadda : हिंदुहृदयसम्राटांचा मुलगा तेव्हा काय करत होता? त्यांना जनतेने माफ करू नये...

नड्डांची 'या' मतदारसंघात होणार सभा

जे पी नड्डा हे २० जानेवारीला पुणे (Pune) दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी ते पुण्यातील शिरुर मतदारसंघात सभा घेणार आहेत. तसेच भोसरी येथे देखील त्यांची सभा होणार आहे. याबाबची माहिती भाजप नेते चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी दिली आहे. दरम्यान, पुणे दौऱ्यावर आल्यावर नड्डा नेमकी काय बोलतात? ते पाहणं महत्वाचे असणार आहे.

j. p. nadda
Satara : छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास भाजपने आम्हाला सांगू नये… शशिकांत शिंदे

भाजपचे 'मिशन १४४' काय आहे?

२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपने 'मिशन १४४' सुरु केलं आहे. यामध्ये गेल्या निवडणुकीत भाजपला विजय मिळालेला नव्हता अशा देशातील १४४ लोकसभा मतदारसंघांवर भाजपने विशेष लक्ष केंद्रीत करण्यास सुरू केलं आहे. तर महाराष्ट्रात भाजपचे 'मिशन ४५' ठेवलं आहे.

याच मिशनसाठी काही केंद्रीय मंत्र्यांचे दौरे लोकसभा मतदारसंघात पार पडले आहेत. आता भाजपचे प्रमुख नेते या १४४ मतदारसंघात दौरे करणार असून निवडणुकीची रणनीती आखणार आहेत. त्याचाच एक भाग म्हणून औरंगाबाद आणि चंद्रपूर येथे जे.पी.नड्डा यांची सभा झाली. तर आता जे पी नड्डा महिनाभरातच पुन्हा पुण्यात येणार आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com