राष्ट्रवादीने खाते उघडले; पण भाजपने जाणकरांचा अंदाज चुकवत पॅनेल दिला!

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्यासाठी भाजपचा पॅनेल जाहीर
Sangram Sorte
Sangram SorteSarkarnama

सोमेश्वरनगर (जि. पुणे) : जाणकारांचे अंदाज चुकवत भाजपने अखेर वीस जणांचा पॅनेल दिला आहे. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत 'सोमेश्वर विकास पॅनेल' विरूध्द भाजप पुरस्कृत 'सोमेश्वर परिवर्तन पॅनेल' असा सरळ सामना होणार आहे. दरम्यान, ‘भाजप पुरस्कृत' पॅनेलला ब वर्ग मतदारसंघात उमेदवारच न मिळाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे संग्राम तानाजीराव सोरटे हे बिनविरोध निवडून आले आहेत. (BJP announces panel for Someshwar co-operative sugar factory)

सोमेश्वर कारखान्याच्या निवडणुकीत नेहमी कडवे आव्हान देणाऱ्या शेतकरी कृती समितीसोबत आजपर्यंत भाजपचा गट होता. आता स्वतंत्रपणे भाजपला उमेदवार मिळणार नाहीत व निवडणूक बिनविरोध होईल, अशी शक्यता वर्तविण्यात येत होती. या पार्श्वभूमीवर २१ पैकी २० जागांवर उमेदवारी हेच यश मानले जात आहे. सोसायटी (ब वर्ग) मतदारसंघातून मात्र अपयश आल्याने संग्राम सोरटेंच्या रूपाने राष्ट्रवादीस पहिले निर्विवाद यश मिळाले आहे.

Sangram Sorte
कात्रज डेअरीत मिळालेली नोकरी सोडली...अन्‌ थेट संघाचा चेअरमनच झालो..!

परिवर्तन पॅनेलकडून पुणे प्रादेशिक बाजार समितीचे माजी प्रशासक दिलीप खैरे, माजी संचालक पी. के. जगताप, बाळासाहेब भोसले हे अनुभवी चेहरे आहेत. सोरटेवाडीत बायडाबाई सोरटे व माजी सरपंच आदिनाथ सोरटे या माय-लेकांना, तर सदोबाचीवाडीतून निवृत्त मुख्याध्यापक विठ्ठल पिसाळ व गणपत होळकर या दोघांना संधी असून खलिल काझी यांच्या रूपाने पहिलाच मुस्लीम चेहरा निवडणुकीत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी न मिळालेल्या पाडेगाव, वीर, वाठार, नीरा, लाटे या गावांना भाजपने चुचकारले आहे.

Sangram Sorte
मोदी, शहांनी माझ्या पराभवाचा कट रचला

भाजपनेही दिले पाच युवा चेहरे

करंजे सोसायटीचे उपाध्यक्ष हनुमंत शेंडकर, श्रीदत्त कृषीपूरक संस्थेचे अध्यक्ष शंकर दडस, बाबुराव गडदरे, सुजाता जेधे, ऋषिकेश धसाडे असे पाच युवा चेहरे दिले आहेत. तर भगवान माळशिकारे, अजितकुमार धुमाळ, संपत भोसले, रामदास गुळमे असे सामान्य शेतकरीही प्रथमच लढत आहेत.

भारतीय जनत पक्ष प्रणित सोमेश्वर परिवर्तन पॅनेल पुढीलप्रमाणे : निंबुत-खंडाळा गट- बाबुराव दशरथ गडदरे (गडदरवाडी), श्रीरंग गुलाब साळुंके (वाठार कॉलनी), शंकर पोपट दडस (पाडेगाव). मुरूम-वाल्हे गट- प्रकाश कीसनराव जगताप (मुरूम), संपत रामचंद्र भोसले (वाणेवाडी), हनुमंत पांडुरंग शेंडकर (शेंडकरवाडी). होळ-मोरगाव गट-विठ्ठल गणपत पिसाळ (सदोबाचीवाडी), खलील इस्माईल काझी (होळ), गणपत रामचंद्र होळकर (सदोबाचीवाडी). कोऱ्हाळे-सुपे गट-दिलीप शंकरराव खैरे (खंडूखैरेवाडी), भगवान वामनराव माळशिकारे (कोऱ्हाळे बुद्रुक), रामदास राजाराम गुळमे (लाटे). मांडकी-जवळार्जुन गट-अजितकुमार कृष्णाजी धुमाळ (जेऊर), बजरंग निवृत्ती किन्हाळे (मांडकी), सुरेश गणपत कुदळे (बेलसर). अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी-बाळासाहेब रामचंद्र भोसले (नीरा). इतर मागासवर्गीय प्रतिनिधी

ऋषिकेश बाळासाहेब धसाडे (वीर). भटक्या विमुक्त जाती व जमाती प्रतिनिधी- आदिनाथ वामन सोरटे (सोरटेवाडी). महिला राखीव- सुजाता अरविंद जेधे (नीरा-शिवतक्रार), बायडाबाई वामन सोरटे (सोरटेवाडी).

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com