भाई का बर्थडे भाईला पडला महागात; पोलिसांनी घेतल ताब्यात...

Crime : अतिष लांडगे असे ताब्यात घेतलेल्या बर्थडे बॉयच नाव आहे.
Crime News
Crime NewsSarkarnama

पुणे : पुण्यात दहशत निर्माण करण्यासाठी वाढदिवसाच्या दिवशी धारधार कोयत्याने केक कापणारा व त्याचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल करणारा बर्थडे बॉय अखेर पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट १ च्या ताब्यात आला आहे.

Crime News
थेट जनतेतून : 16 जिल्ह्यांतील 547 सरपंचांचा फैसला उद्या

अतिष लांडगे असे ताब्यात घेतलेल्या बर्थडे बॉयच नाव असून त्याच्याकडून एक कोयता आणि ५०० रुपये, असा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. पुणे शहरात गेले अनेक दिवसांपासून असे केक कापून व्हिडिओ व्हायरल करण्याच्या घटनेत वाढ झाली आहे. त्यास आळा घालण्यासाठी पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी खडक पोलिसांत गुन्हा दाखल होता. त्यानंतर गुन्हे शाखेनी ही कारवाई केली आहे. (Crime News)

हेही वाचा : 'अमूल डेअरी' फ्रॅन्चायझीच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाला १० लाखांचा गंडा

गुजरात, आनंद येथील अमूल डेअरीची फ्रॅन्चायझी मिळवून देण्याच्या बहाण्याने एका चोरट्याने पुण्यातील एका ज्येष्ठ नागरिकाची फसवणूक केली आहे.या ज्येष्ठ नागरिकाला तब्बल 10 लाख 42 हजार रुपयांचा गंडा घातला असल्याची माहिती मिळाली आहे.

यासाठी या सायबर चोरट्यांनी आनंद येथील इंडियन बँकेच्या खात्याचा वापर केला आहे. याबात या ज्येष्ठ नागरिकाने पुण्यात बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हा सर्व प्रकार गेल्या १ महिन्यापासून सुरू होता, अशी माहिती मिळत आहे.

Crime News
उद्धव ठाकरेंकडे बोलायला चांगले वाक्य नसतील तर मला फोन करावा...

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींकडून फिर्यादी यांना फोन करुन अमूल डेअरी डिस्ट्रीब्युशन फ्रॅन्चायझी देण्याचा बतावणी करण्यात आली होती. गुजरातमधील आनंद येथे अमूलचे मुख्य कार्यालय असल्या कारणाने तेथील स्थित्त असलेल्या इंडियन बँकेच्या खात्यात पैसे भरायला सांगितले. यामुळे फिर्यादी यांना विश्वास बसला. आपल्याला फ्रॅन्चायझी मिळेल या आशेने त्यांनी एका महिन्यात तब्बल १० लाखांपेक्षा अधिक रक्कम जमा केली. मात्र अजून काही रक्कम लागणार असल्याची मागणी केली गेली. मात्र काम होत नव्हते, हे लक्षात येताच आपली फसवणूक झाली हे समजल्यावर फिर्यादी यांनी पोलिसांकडे धाव घेतली आहे.

दरम्यान, या प्रकरणी पोलिसांनी सायबर चोरट्यांच्या विरोधात तसेच बँक खातेधारकांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलीस करत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in