Pune Breaking News: शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटर घोटाळाप्रकरणी मोठी अपडेट; 'लाईफ लाईन'च्या राजीव साळुंखेंना अटक

Shivajinagar Jumbo Covid center Scam : भाजप नेते किरीट सोमय्या यांनी ट्विटर करुन दिली माहिती...
Shivajinagar Jumbo Covid center Scam
Shivajinagar Jumbo Covid center Scam Sarkarnama

Pune: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुण्यातील शिवाजीनगर येथील कोविड सेंटरमध्ये घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. यावेळी त्यांनी शिवसेना नेते संजय राऊतांशी जवळचे संबंध असल्यानेच एका चहावाल्याला या कोविड सेंटरचं कंत्राट ठाकरे सरकारनं दिला असल्याचंही आरोपही केला होता.त्यामुळे एकच खळबळ उडाली होती. मात्र, आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर आली आहे.

शिवाजीनगर जम्बो कोविड सेंटर घोटाळा प्रकरणी एकाला अटक करण्यात आली आहे. राजीव साळुंखे असे जम्बो कोविड सेंटरच्या गैरव्यवहारप्रकरणी अटक करण्यात आलेल्या व्यक्तीचे नाव आहे. साळुंखे हे संजय राऊत आणि सुजित पाटकर यांचे पार्टनर आहे. साळुंखे यांच्या अटकेची माहिती भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी ट्विटर करुन दिली आहे.

Shivajinagar Jumbo Covid center Scam
Shinde Vs Thackeray : वज्रमूठ सभेआधीच शिंदेंचा ठाकरेंना मोठा धक्का; पक्षाची खडा न् खडा माहिती असलेला मोहरा गळाला...

संजय राऊत(Sanjay Raut)चे पार्टनर,सुजित पाटकर यांचा लाईफलाईन हॉस्पिटल मॅनेजमेंट सर्व्हिसेस चे भागीदार राजू नंदकुमार साळुंखे यांना पुण्यातील जम्बो कोविड सेंटरच्या गैरव्यवहार प्रकरणी पुणे पोलिसांनी अटक केली असून त्यांना सोमवारपर्यंत पोलीस कोठडीमध्ये ठेवण्याचा आदेश पुणे सत्र न्यायालयाने दिला आहे.

भाजप नेते डॉ. किरीट सोमय्यांनी हा घोटाळा उघडकीस आणला होता. शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार ही केली होती. या प्रकरणी सुजित पाटकर आणि लाईफ लाईन कंपनीचा विरुद्ध मुंबई पोलिसांनी या आधीच गुन्हा दाखल केला आहे. शिवाजीनगर कोविड सेंटरमध्ये ३ रुग्णांचा मृत्यू झाला होता. डॉ. सोमय्या यांच्या तक्रारीनंतर पुणे महानगरपालिके(PMC)ने तसेच पीएमआरडीएने सदर कंपनी विरुद्ध तक्रार दाखल केली होती.

Shivajinagar Jumbo Covid center Scam
Kapil Sibal on BJP: 'या' दोन राज्यातील सत्ता पाडण्यासाठी भाजपचे प्रयत्न सुरु; कपिल सिब्बलांचा मोठा दावा

सोमय्यांचा आरोप काय?

राजीव साळुंखे(Rajiv Salunkhe) हे सुजीत पाटकर यांच्या कंपनीत पार्टनर आहेत. आणि पाटकर हे शिवसेना नेते संजय राऊत यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप किरीट सोमय्या यांच्याकडून करण्यात आला होता. साळुंखे यांचं परळला केईएम हॉस्पिटलसमोर त्यांचं सह्याद्री रिफ्रेशमेंट नावाचं हॉटेल आहे. साळुंखे यांना पुण्यातील 100 कोटींचं जम्बो कोव्हिड सेंटर दिलं गेलं आहे. हॉटेलचं केवळ एक लाख रुपये इन्कम टॅक्स रिटर्न भरणाऱ्या साळुंखेंना 100 कोटींचं कंत्राट कसं मिळालं? असा सवाल सोमय्या यांनी केला होता.

काय आहे प्रकरण ?

लाईफ लाईन हॉस्पिटल सर्व्हिसेस मॅनेजमेंट हे साळुंखे यांचं आहे. तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे त्यावेळी पीएमआरडीएचे चेअरमन असल्यानेच लाईफ लाईन हॉस्पिटल सर्व्हिसेस मॅनेजमेंटला जम्बो कोविड सेंटरचं काम देण्यात आलं. लाईफ लाईनला काम देताना ठाकरेंनी दबाव आणला. या रुग्णालयात अनेकांचे मृत्यू झाले. 9 दिवसांत लाईफ लाईनला ब्लॅक लिस्ट करण्यात आलं असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला होता.

Shivajinagar Jumbo Covid center Scam
Aatpadi Bazar Samiti: पवारांवर कायम तुटून पडणाऱ्या पडळकरांची आटपाडीत राष्ट्रवादीशी युती...

उद्धव ठाकरे यांचा आग्रह आणि दबावामुळेच लाईफ लाईनला महाराष्ट्रात 7 कोविड सेंटर चालवण्यासाठी देण्यात आले. 65 कोटी रुपयांचं पेमेंट करण्यात आलं. जी कंपनी अस्तित्वात नाही, त्या कंपनीने कंत्राट मिळवण्यासाठी बोगस कागदपत्रे सादर केली. उद्धव ठाकरे यांचा राईट हॅन्ड या कंपनीचा मालक आहे. त्याची चौकशी सरकार करणार का? असा सवाल किरीट सोमय्या यांनी विचारला होता.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com