Zika Virus News : पुणे शहरात 'झिका'चा शिरकाव; पहिला रुग्ण आढळला

Zika Virus : गोवरचा प्रादुर्भाव वाढत असताना झिकाचा रुग्ण आढळल्याने पुणेकरांची चिंता वाढली.
Zika Virus latest news
Zika Virus latest newsSarkarnama

Zika Virus News : मागील वर्षी पुणे जिल्ह्यातील बेलसर येथे झिकाचा रुग्ण आढळला होता. यावर्षी राज्यातील झिकाचा पहिला रुग्ण पालघर येथे आढळल्यानंतर या वर्षातला दुसरा रुग्ण पुणे शहरात आढळला असल्याचं समोर आलं आहे.

याबाबतची माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने शुक्रवारी (दि.2) दिली आहे. त्यामुळे शहरात आधीच गोवरचा प्रादुर्भाव वाढत असताना झिकाचा (Zika Virus) देखील रुग्ण देखील आढळल्याने पुणेकरांची चिंता वाढली आहे. राज्यात गेल्या दोन वर्षांमध्ये झिकाचे निदान झालेला हा तिसरा रुग्ण आहे.

Zika Virus latest news
NCP : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी कोश्यारींनी दिली शिवाजी महाराजांची तीन पुस्तके..

झिकाचे निदान झालेला रुग्ण मूळचा नाशिकचा असून तो 67 वर्षांचा आहे. तो 6 नोव्हेंबरला पुण्यात कामासाठी आला होता. यावेळी त्याला ताप, खोकला, सांधेदुखी आणि थकवा जाणवू लागला. त्यामुळे त्याने वैद्यकीय सल्ल्यासाठी 16 नोव्हेंबरला जहांगीर रुग्णालय गाठले. यात संबंधित रुग्णाला झिकाचा संसर्ग झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर रुग्णाचा रक्तनमुना तपासण्यासाठी राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेत (एनआयव्ही) पाठविण्यात आला. एनआयव्हीने 30 नोव्हेंबरला दिलेल्या अहवालात रुग्णाला झिकाचा संसर्ग झाल्याचे अधोरेखित केले अशी माहिती राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागातर्फे देण्यात आली. या रुग्णाने पुण्यात येण्याआधी सुरतला गेला होता. ( Zika Virus latest news)

Zika Virus latest news
Captain Amarinder Singh : भाजपचा मोठा निर्णय : कॅप्टन अमरिंदर सिंगांवर सोपवली मोठी जबाबदारी

झिकाच्या संसर्गाचे प्रमाण सौम्य...

आपल्याकडे एडीस डास मोठ्या प्रमाणात आहेत. आणि एडीस डासापासूनच डेंगी, चिकुनगुनिया आणि झिका या तीन आजारांचा संसर्ग होतो. आपल्याकडे एडीस डास मोठ्या प्रमाणात आहेत. राज्यात डेंगी आणि चिकुनगुनियाचे रुग्ण आढळतात. त्यामुळे झिकाचे रुग्ण आढळणे शक्य आहे. झिकाच्या सुमारे 80 टक्के रुग्णांना कोणतेही ठळक लक्षणे दिसत नाहीत. त्यामुळे त्याचे निदान लवकर होत नाही. पालघर, बेलसर आणि आता पुणे या ठिकाणी झिकाचे रुग्ण आढळल्याने या आजाराचा संसर्ग होत असल्याचे दिसत आहे. पण, त्याच्या संसर्गाचे प्रमाण सौम्य आहे अशी माहिती राज्याचे साथरोग सर्व्हेक्षण अधिकारी डॉ. प्रदीप आवटे यांनी दिली आहे.

रुग्णाच्या परिसरातील घरांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. या सर्व्हेक्षणात एकही संशयित रुग्ण आढळला नाही. या भागात डासोत्पत्तीसाठी घरोघर सर्व्हेक्षण, कंटेनर सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. मात्र, परिसरात एडीस डासाची उत्पत्ती आढळलेली नाही. मात्र, खबरदारीच उपाय म्हणून बावधन परिसरात ताप रुग्ण सर्व्हेक्षण आणि कीटकशास्त्रीय सर्व्हेक्षण अधिक गतिमान करण्यात आले आहे, अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com