Kasba By-Election : कसबा-चिंचवडमध्ये तुम लढो, हम 'मनसे' कपडे संभालते है !

Pune By Election : कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीत मनसेचा भाजपला पाठिंबा
MNS News
MNS News Sarkarnama

ज्ञानेश्वर हिंगोलीकर

Chinchwad and Kasba By-Election : कसबा आणि चिंचवडची पोटनिवडणूक ही भाजप आणि महाविकास आघाडीसाठी प्रतिष्ठेची बनली आहे. असे असतानाच मनसेने कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत भाजपला मदत करणार असल्याचे घोषित केले आहे.

मनसेचे नेते बाबू वागसकर यांनी ही माहिती दिली असून चिंचवड आणि कसबा या दोन्ही ठिकाणी मनसेची हीच भूमिका राहणार आहे.

MNS News
Raju Shetti News: तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेली 'ती' ऑफर राजू शेट्टींनी नाकारली; दिलं 'हे' कारण

या पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या प्रचारात मनसे सहभागी होणार नाही. मात्र, मनसे मतदानामध्ये भाजपला मदत करणार असल्याची चर्चा मनसे आणि भाजपच्या वरिष्ठ स्तरावर झाली आहे. तसेच या निवडणुकीमध्ये भाजपला मदत करण्याचा आदेश मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दिला असल्याची माहिती मनसेच्या नेत्यांनी दिली.

MNS News
Satyajeet Tambe Tweet : 'उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी,' ; तांबेंना स्वगृही परतायचं नाही का? ट्विटचा अर्थ काय?

भारतीय जनता पक्षाचे निवडणूक प्रभारी मुरलीधर मोहोळ आणि कसबा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक प्रमुख आमदार माधुरी मिसाळ यांनी आज मनसे कार्यालयात शिदोरे आणि वागसकर यांची भेट घेतली. त्यानंतर मनसेच्यावतीने बाबू वागसकर यांनी ही पाठिंबा देण्याची भूमिका स्पष्ट केली. पक्षाच्या वरिष्ठ पातळीवर या संदर्भात निर्णय झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

MNS News
Kasba By-Election : चंद्रकांतदादांनी कसब्याची निवडणूक लईच मनावर घेतली; कोथरुडमधून मुक्कामच हलवला

दरम्यान, या निवडणुकीत मनसे भारतीय जनता पक्षाबरोबर प्रत्यक्ष प्रचारात सहभागी होणार नाही. मात्र, मतदानाच्या पातळीवर भाजप उमेदवार हेमंत रासने यांना संपूर्ण पाठिंबा देणार असल्याचे जाहीर केले आहे.

कसबा-चिंचवड पोटनिवडणुकीमध्ये भाजपच्या प्रचारात मनसे सहभागी होणार नाही. मात्र, थेट मतदानामध्ये मदत करणार अशी भूमिका मनेसेने घेतल्यामुळे ''तुम लढो, हम 'मनसे' कपडे संभालते है !'' अशी गत मनसेची झाली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com