Pune News : पुणेकरांसाठी मोठी बातमी! मिळकत करात 40 टक्के सवलतीचा निर्णय

Eknath Shinde : पुणेकरांना या निर्णयामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.
Pune Municipal Corporation
Pune Municipal CorporationSarkarnama

Mumbai : पुणेकरांना मिळकत करात 40 टक्के सवलतीसह तीन पट शास्तीकर रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली महत्वाची बैठक पार पडली. यावेळी हा मोठा निर्णय घेण्यात आला. तसेच येणाऱ्या कॅबिनेटच्या बैठकीत याबाबतचा प्रस्ताव आणून याला मान्यता देण्यात येणार असल्याचं सांगण्यात आलं आहे.

Pune Municipal Corporation
BJP News : चित्रा वाघांच्या अडचणी वाढल्या ; न्यायालयाचा दणका, राष्ट्रवादीच्या नेत्याने..

पुणेकरांना मिळकत करात सवलत मिळावी, यासाठी पुण्यातील भाजपच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती.

तसेच पुणे महानगरपालिका हद्दीत मिळकत करात पुणेकरांना देण्यात येणारी 40 टक्के सवलत कायम ठेवावी, अशी मागणी या शिष्टमंडळाने केली होती.

Pune Municipal Corporation
Coal Washeries: सभागृहात कोळसा पेटला : १.२० लक्ष मेट्रिक टन कोळसा गायब; खडसेंनी सांगितले अर्थकारण !

दरम्यान, पुणेकरांना मिळकत करात 40 टक्के सवलतीचा निर्णय कायम ठेवण्यात आल्यामुळे या शिष्टमंडळाच्या मागणीला यश आलं आहे. या निर्णयामुळे पुणेकरांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in