मोठी बातमी! देशात कोरोनाचा विळखा कमी, पण, पुण्यात काय परिस्थिती?

गेल्या दोन वर्षांपासून देशात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे (Corornaa virus) पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लाखो लोकांना आपले प्राण गमावले.
Ajit Pawar
Ajit Pawar

पुणे : गेल्या दोन वर्षांपासून देशात थैमान घातलेल्या कोरोना विषाणूच्या (Covid 19) संसर्गामुळे पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत लाखो लोकांना आपले प्राण गमावले. कोरोनाने अक्षरश: देशात थैमान घातले होते. त्यानंतर तिसऱ्या लाटेचीही शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत होती. आता पुन्हा एकदा कोरोना विषाणूबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी पुण्यात याबाबत नुकतीच पत्रकार परिषदेत माहिती दिली.

देशात कोरोना संसर्गाचा विळखा कमी होताना दिसत आहे. ताजी आकडेवारी पाहता, देशात दैनंदिन कोरोनाबांधितांच्या संख्येत सातत्याने घट होत आहे. देशात गेल्या चोवीस तासात 50,407 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 804 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर काल देशात 58077 नवे कोरोना रुग्ण आढळून आले होते, तर 657 जणांचा मृत्यू झाला होता. तर गेल्या 24 तासात देशात एकूण 1,36,962 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच, 6,10, 443 इतकी देशातील सक्रिय रुग्णांची संख्या झाली आहे. तर दैनंदिन पॉझिटीव्ह रुग्णांचा दर 3.48 वर पोहोचला आहे. दरम्यान, लसीकरण मोहिमेअंतर्गत, देशात आतापर्यंत सुमारे 172 कोटी कोरोना प्रतिबंधात्मक लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल 46,82,662 डोस देण्यात आले,

Ajit Pawar
अनिल देशमुखांचे सीए विशाल खटवानी यांच्या कार्यालयावर सीबीआयची धाड..

- पुण्यात काय परिस्थिती?

पुण्यातही कोरोना संसर्गाची परिस्थिती आता आटोक्यात आली आहे. पुण्याचा पॉझिटिव्हिटी रेट 15 टक्के इतका आहे, तर राज्याचा पॉझिटिव्हिटी रेट 9 टक्के आहे. ते पाहता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी बोलून लवकरच राज्यातील कोरोनाचे नियम शिथिल केले जातील, अशी माहिती अजित पवार यांनी दिली. मात्र कोव्हॅक्सिन लसीचा पुरवठा कमी असल्यामुळे सध्या 15 ते 18 वर्षे वयोगटातील तरुणांच्या लसीकरणाचा वेग सध्या मंदावला आहे. मात्र या वयोगटातील लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी लवकरच केंद्र सरकारशी चर्चा केली जाईल. त्याचबरोबर सध्या चित्रपटगृहांमध्ये 50 टक्के प्रेक्षकांना उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आली आहे.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, सध्या देशातील पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 6,10, 443 वर आली आहे. कोरोनामुळे जीव गमावणाऱ्यांची संख्या पाच लाख सात हजार 981 इतकी झाली आहे. आकडेवारीनुसार, शुक्रवारी दिवसभरात 1 लाख 36 हजार 962 रुग्ण कोरोनामुक्त झाले. आतापर्यंत 4 कोटी 14 लाख 68 हजार 120 लोक संसर्गमुक्त झाले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com