Pune By-Election: मोठी बातमी! चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर

पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवड चे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले.
Pune By-Election: मोठी बातमी! चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर

Pune News : केंद्रीय निवडणूक आयोगाने पुण्यातील कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकांची तारीख जाहीर केली आहे. येत्या २७ फेब्रुवारी २०२३ रोजी या दोन्ही जागांसाठी मतदान प्रकिया पार पडणार आहे. तर २ मार्च रोजी मतमोजणी होणार आहे.

भाजपच्या पुण्यातील कसबा विधानसभा मतदार संघाच्या आमदार मुक्ता टिळक आणि चिंचवडचे विधानसभा मतदार संघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने विधानसभेच्या या जागा रिक्त झाल्या आहेत. या जागांवर आज केंद्रीय निवडणुक आयोगाने या जागांसाठी पोटनिवडणुक जाहीर केली.

भारतीय जनता पक्षाचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे ३ जानेवारी २०२३ रोजी दीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्यावर बाणेरमधील खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते. जगताप यांची गेल्या तीन वर्षांपासून कर्करोगाशी सुरु असलेली झुंज अखेर अपयशी ठरली.  त्यामुळे चिंचवड विधानसभेची ही जागा रिक्त झाली होती.

Pune By-Election: मोठी बातमी! चिंचवड आणि कसबा विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक जाहीर
Election Commission News : पूर्वेकडील तीन राज्यांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले..; या तारखांना होणार मतदान

तर, पुण्यातील कसबा मतदार संघाच्या भाजपच्या (BJP) आमदार मुक्ता टिळक (Mukta Tilak) यांचे २२ डिसेंबर २०२२ रोजी निधन झाले. टिळक यादेखील अनेक दिवसांपासून दुर्धर आजाराने ग्रस्त होत्या. गॅलक्सी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यामुळे कसबा विधानसभेचीही जागाही रिक्त झाली होती.

टिळक आणि जगताप यांच्या निधनानंतर विधानसभेच्या त्यांच्या या निधनानंतर या जागेवर पोटनिवडणुक कधी लागणार याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु होती. तर दुसरीकडे आज देशातील इतर राज्यांच्या विधानसभा निवडणुका जाहीर करण्यात येणार होत्या. त्यातच निवडणूक आयोगाने आज कसबा आणि चिंचवड विधानसभेच्या निवडणूकाही जाहीर केल्या आहे. त्यामुळं आता या जागांवर भाजप आणि राष्ट्रवादी कोणता उमेदवार देणार, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

अशी असेल प्रक्रिया -

अर्ज दाखल करण्याची मुदत : ७ फेब्रुवारी २०२३

अर्जांची छाननी : ८ फेब्रुवारी

अर्ज मागं घेण्याची मुदत : १० फेब्रुवारी

मतदान : २७ फेब्रुवारी

मतमोजणी आणि निकाल : २ मार्च

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com