Kasba By Election Results: मोठी बातमी! कसब्यात चौथ्या फेरीअखेर रासने आघाडीवर धंगेकरांचं मताधिक्य घटलं

Bjp Vs Mahavikas Aaghadi : कसब्यात विजयाचा गुलाल कोण उधळणार ?
Ravindra Dhangekar
Ravindra DhangekarSarkarnama

Pune News : कसबा , चिंचवड पोटनिवडणुकीची मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या फेरीपासून पिछाडीवर असलेल्या भाजप उमेदवार हेमंत रासने यांनी चौथ्या फेरीअखेर हेमंत रासनेंनी पिछाडी भरुन काढत २०० मतांची आघाडी घेतली आहे.

तिसऱ्या फेरीअखेर महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना ११,७६१ मतं तर हेमंत रासने यांना १०,६७३ मतं पडली आहे. तिसऱ्या फेरीत आघाडी घेतली आहे. धंगेकर यांच्यापेक्षा ६०० मतांनी आघाडी घेतली आहे. तिसऱ्या फेरीअखेर धंगेकरांचं मताधिक्य घटलं असून एकूण ६७७ मतांनी आघाडी आहे.

कसबा पेठ आणि चिंचवड या दोन मतदारसंघात सुरु असलेल्या पोटनिवडणुकीसाठी आज (दि.२) मतमोजणी सुरु झाली आहे. चिंचवडमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल काटे, भाजपच्या अश्विनी जगताप आणि अपक्ष राहुल कलाटे या तीन उमेदवारांचे भवितव्य तिरंगी लढत होत आहे. कसबा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्याविरोधात भाजपचे हेमंत रासने रिंगणात आहेत.

Ravindra Dhangekar
Kasba - Chinchwad By Election Results : कसब्यात धंगेकर आघाडीवर तर रासनेंची पिछाडी, चिंचवडला जगताप आघाडीवर

कसबा आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघातील पोटनिवडणुकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.या चुरशीच्या निवडणुकीत भाजपकडून मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांसह जवळपास डझनभर मंत्री,नेते प्रचारात उतरवले होते. तर काँग्रेस व राष्ट्रवादीकडून देखील माजी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांसह राज्यातील कार्यकर्ते, नेत्यांची फौज उभी केली होती.

Ravindra Dhangekar
By Election News : "Who is Dhangekar? कसबा तो झाकी है..."; पुण्यात आता फ्लेक्सची चर्चा

कसबा विधानसभा मतमोजणीच्या 20 फेऱ्या

कसबा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची मतमोजणी सकाळी आठ वाजता भारतीय खाद्य निगम (एफसीआय) गोदाम, कोरेगाव पार्क पुणे येथे सुरू होत आहे. त्यासाठी मतमोजणीच्या 20 फेऱ्या होणार आहे.

ईव्हीएम मतमोजणीसाठी 14 टेबल तर टपाली मतपत्रिकांसाठी आणि सर्व्हिस वोटर्ससाठीच्या इटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) प्रत्येकी एक टेबल ठेवण्यात आला आहे. सर्वप्रथम टपाली आणि ईटीपीबीएसची मोजणी होईल. त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक टेबलवर 1 मतमोजणी पर्यवेक्षक, 1 मतमोजणी सहायक आणि 1 सूक्ष्म निरीक्षक असे एकूण सुमारे 50 अधिकारी- कर्मचारी नेमण्यात आले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com