Shailaja Darade News : मोठी बातमी! परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडेंवर नोकर भरती प्रकरणात गुन्हा दाखल

Education Department News: शिक्षक पदावर नोकरी देण्याचे आमिष दाखवून ४६ जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक
Shailaja Darade
Shailaja DaradeSarkarnama

Pune News : महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचे दोन अध्यक्षांना टीईटी घोटाळ्यात अटक झाल्यानंतर शैलजा दराडे यांची त्या जागी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, दराडे याही अडचणीत आल्या आहेत. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे यांच्यासह भावाविरुध्द हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर शिक्षण संचालक म्हणून कार्यरत असताना राज्यातील 45 शिक्षकांकडून प्रत्येकी 12 ते 14 लाख रुपये घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणी पोपट सुखदेव सूर्यवंशी (रा. खानजोडवाडी, ता. आटपाडी, जि. सांगली) यांनी फिर्याद दिली असून हडपसर पोलिसांनी शैलजा रामचंद्र दराडे (रा. रेव्हेरायीन ग्रीन्स, पाषाण, पुणे) आणि दादासाहेब रामचंद्र दराडे (रा. अकोले, ता. इंदापूर) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार १५ जून २०१९ पासून सुरु होता.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्त शैलजा दराडे (Shailaja Darade ) यांच्यासह भावाविरुध्द हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यामुळे शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे. शिक्षक पदावर नोकरी देण्याचे आमिष दाखवून ४६ जणांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक(Fraud) केल्याचा ठपका ठेवण्यात आला आहे.

Shailaja Darade
NashikNews; `मनसे`च्या शहराध्यक्षांनी ठेकेदाराकडे पैसे मागीतले?

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शैलजा दराडे परीक्षा परिषदेच्या आयुक्त आहेत. तर, दादासाहेब दराडे हे त्यांचे भाऊ आहेत. दादासाहेब दराडे याने त्यांची बहीण शैलजा दराडे या शिक्षण विभागात प्रशासन अधिकारी आहेत, असे सांगून फिर्यादीचा विश्वास संपादन केला. फिर्यादीच्या दोन नातेवाईकांना शिक्षक पदावर नोकरी लावतो, असे सांगून त्याने प्रत्येकी १२ लाख आणि १५ लाख रुपये घेतले.

परंतू, त्यांना आजपर्यंत शिक्षक म्हणून नोकरी लावली नाही. त्यामुळे फिर्यादीने पैसे परत करण्याची मागणी केली. मात्र, आरोपींनी दोघांचेही पैसे परत केले नाहीत. प्राथमिक तपासात या दोघांसमवेत इतर ४४ जणांची फसवणूक झाल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.

Shailaja Darade
Shatrughan Sinha : मोदी PM होऊ शकतात तर तेजस्वी यादव का नाही ? TMC खासदाराचा सवाल

दरम्यान, आयुक्त शैलजा दराडे यांनी त्यांचा भाऊ दादासाहेब दराडे याच्याशी काहीही संबंध नाही. परीक्षा परिषदेचा आयुक्त असल्याचा गैरफायदा घेऊन तो लोकांना नोकरी लावून देतो, असे सांगत आहे. दादासाहेब दराडे याच्यासोबत कोणीही कसलाही व्यवहार करु नये, अशी जाहीर नोटीस शैलजा दराडे यांनी ऑगस्ट २०२० मध्ये दिली होती असे सांगण्यात आले. याबाबत आयुक्त दराडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांचा फोन बंद असल्यामुळे तो होऊ शकला नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
logo
Sarkarnama
www.sarkarnama.in