PCMC News: पिंपरी चिंचवडला गडकरींकडून मोठं गिफ्ट: 'या' मार्गांवर होणार नवे फ्लाय ओव्हर

नवले पुलावरील अपघात रोखण्यासाठी नव्या उपाययोजना केल्या जाणार
Nitin Gadkari
Nitin GadkariSarkarnama

PCMC News: केंद्रीय रस्ते वाहतुक मंत्री नितीन गडकरी यांनी पिंपरी-चिंचवड करांना मोठं गिफ्ट दिलं आहे. शहरातील वाढती लोकसंख्या आणि त्या दृष्टीने होणारी वाहतुक कोंडीला रोखण्यासाठी गडकरींनी चार नव्या उन्नत मार्गांची घोषणा केली आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी शनिवारी (११ मार्च) पुण्यात याबाबत घोषणा केली.

नाशिक फाटा ते खेड,तळेगाव ते चाकण, हडपसर ते दिवेघाट आणि वाघोली ते शिरुर या मार्गांवर नवे उन्नत मार्ग म्हणजेच फ्लाय ओव्हर बांधण्यात येणार आहे. या मार्गांसाठी तब्बल ५३ हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

Nitin Gadkari
Mumbai Bomb Blast 1993 : 12 बॉम्बस्फोट अन् रक्तरंजित मुंबईच्या भळभळणाऱ्या जखमा... पाहा फोटो

या नुसार, नवले पूल आणि कात्रज देहूरोड बायपासवरील वाहतूक कोंडी आणि वारंवार होणारे अपघातांच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कात्रज-देहूरोडसाठी स्वतंत्र प्रकल्प आराखडा तयार करण्याचे काम सुरु असल्याचं यावेळी गडकरी यांनी सांगितलं. नवले पूलावरील अपघात टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. तसेच, या परिसरात पर्यायी पूल बांधण्याचाही विचार करत असल्याचं गडकरींनी यावेळी सांगितलं.

नाशिक फाटा ते खेड २९किलोमीटरसाठी आठ हजार कोटी रुपये, तळेगाव ते चाकण ५४ किमीसाठी ११ हजार कोटी, हडपसर ते दिवेघाट १२ किमी मार्गासाठी ८२३ कोटी आणि वाघोली ते शिरुर ५६ किमी मार्गासाठई १० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असल्याचं गडकरी यांनी सांगितलं. याशिवाय पुणे बंगळूर एक्सप्रेस वे २०६ किलोमीटर, पुणे-औरंगाबाद २६८ किलोमीटर अशी ६२५ किलोमीरटची ५३ हजार कोटी रुपयांची पुणे जिल्ह्यात कामे प्रस्तावित आहेत. ही जवळपास मंजूर झाली आहेत. यातील भूसंपादनाची कामेही सरु झाली असल्याचं गडकरींनी स्पष्ट केलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com