Pimpri-Chinchwad : काँग्रेसला मोठा धक्का; पिंपरी-चिंचवड माजी अध्यक्षाचा राजीनामा

Chinchwad Congress : चिंचवडमध्ये राजीनामासत्र, भाजपच्या कामठेनंतर आता काँग्रेसच्या साठेंनी पक्ष सोडला
Chinchwad Congress
Chinchwad Congress Sarkarnama

पिंपरी : चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीचा प्रचार रंगात आला असतानाच या मतदारसंघात राजीनामासत्र व त्यातून पक्षांत इनकमिंग, आऊटगोईंग सुरु झाले आहे.

गेल्या बुधवारी (ता.१५) माजी नगरसेवक तुषार कामठे यांनी पक्ष सोडल्याने भाजपला धक्का बसला होता. तर, आज पिंपरी-चिंचवड माजी अध्यक्ष आणि प्रदेश सचिव सचिन साठे यांनी पद व पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचाही राजीनामा दिल्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला.

कुठल्या पक्षात जाणार असे विचारले असता सर्व पर्याय खुले असल्याचे साठे म्हणाले. येत्या दोन दिवसांत राजकारणाची पुढील दिशा ठरविणार असल्याचे राजीनाम्यानंतर त्यांनी `सरकारनामा`ला सांगितले. मात्र, त्यांचा पिंड पाहता ते भाजपऐवजी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याची शक्यता अधिक दिसते आहे. तसं झालं, तर चिंचवडमधील आघाडीच्या उमेदवाराला त्याचा फायदा होणार आहे.

Chinchwad Congress
Abhijit Bichukale: ''...म्हणून २०२४ ला महाराष्ट्र माझ्या ताब्यात द्या!''; अभिजित बिचुकले असं का म्हणाले?

उद्या पत्रकापरिषद घेऊन ते आपल्या राजीनाम्याची घोषणा करणार आहेत. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना त्यांनी राजीनामा आज पाठवला. येत्या रविवारी पोटनिवडणूक होत असलेल्या चिंचवडमधील पिंपळे निलखमध्ये ते राहतात. यापूर्वी त्यांनी नगरसेवकपदाची निवडणूक लढविली होती.

दोन तपाहून अधिक काळ पक्षासाठी काम केल्याने विधानपरिषदेवर जाण्याची साठे यांची इच्छा होती. मात्र, त्यासाठी नाही, तर इतरत्रही पक्षात वारंवार डावलले जात असल्याने व संधी मिळत नसल्याने ते नाराज होते.

त्यातून त्यांनी अखेर २६ वर्षानंतर शेवटी पक्षच सोडण्य़ाचा निर्णय़ घेतला. विद्यार्थीदशेपासून पक्षात असलेल्या जुन्या व एकनिष्ठ अशा साठेंच्या पक्ष सोडण्याने काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

Chinchwad Congress
Shivsena News: शिवसेनेच्या मतांचे झाले विभाजन, भाजप हिंदू मते वळवणार आपल्याकडे !

१९७७ पासून ते काँग्रेसमध्ये काम करीत होते. `एनएसयूआय`चे जिल्हाध्यक्ष, प्रदेश युवक उपाध्यक्ष, २०१४ ते २०२० पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष म्हणून त्यांनी आतापर्यंत काम पाहिले आहे. सध्या ते प्रदेश सचिव होते. अनेक राज्यात पक्षाचे निरीक्षक म्हणून त्यांनी काम केले आहे. दोन टर्म शहराध्यक्ष ते होते. त्या पदावरून स्वताहून ते दूर झाले होते.

त्यानंतर डॉ.कैलास कदम यांची त्या जागी नियुक्ती करण्यात आली होती. या नेमणुकीनंतर शहर काँग्रेसमध्ये सरळ दोन गट पडले. तेथून त्यांची पक्षात मोठी घुसमट सुरु झाली. त्याची परिणती अखेर त्यांच्या पक्ष सोडण्यात झाली. राजीनामा पत्रातही त्यांनी गेल्या काही दिवसांपासून पक्षात मोठी घुसमट होत असल्याचे मान्य केले आहे.

Chinchwad Congress
NDCC Bank News: नवे प्रशासक प्रतापसिंह चव्हाण तरी बँकेला सावरतील काय?

वेळोवेळी मांडलेल्या अनेक मुद्यांकडे पक्षाने गांभीर्याने पाहिले नाही. पक्षहितासाठी अनेक विषय उपस्थित केले. त्याचीही दखल घेतली गेली नाही, अशी खदखद साठे यांनी राजीनामा पत्रात व्यक्त केली आहे. पक्षाकडून अशी उपेक्षा सहन करू शकत नाही. त्यामुळे पक्षात राहणे उचित ठरत नाही, असे त्यांनी पुढे म्हटले आहे.

अलिकडच्या काळात पक्षात झालेल्या मोठ्या उपेक्षेतून पक्षात कामच करायची इच्छा राहिली नव्हती, अशी खंत शेवटी त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या राजीनाम्य़ानंतर त्यांचे काही समर्थक पदाधिकारीही काँग्रेस सोडण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या टर्ममध्ये पालिकेत एकही नगरसेवक नसलेल्या या पक्षाची अवस्था आणखी बिकट होण्याची भीती आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com