Pune News : मोठी कारवाई! पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्याला अटक

Crime News : निवड झालेल्या उमेदवाराने सादर केलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचा संशय....
Pune News
Pune NewsSarkarnama

Pune : पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्र सादर केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यानंतर एकच खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणात चतु:शृंगी पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या भरती प्रक्रियेत बनावट प्रमाणपत्र सादर करणाऱ्या उमेदवारास पोलिसांनी अटक केली आहे.

या प्रकरणी चतु:शृंगी पोलिसांनी सचिन भीमराव वाघमोडे (रा. लक्ष्मण टाकळी, ता. पंढरपूर, जि. सोलापूर) याला अटक केली आहे. वाघमोडे याने भरती प्रक्रियेत सुशिक्षित बेरोजगार अंशकालीन (पीटीई) प्रमाणपत्र सादर केले होते. भरती प्रक्रियेत मैदानी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादीनुसार निवड करण्यात आली.

Pune News
Mantralay News : सत्तांतरानंतर मंत्रालयातील गर्दीत मोठी वाढ ; व्यवस्थेवर ताण, प्रशासन 'हा' मोठा निर्णय घेणार..

भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे काम पोलिसांकडून सुरु असतानाच वाघमोडे याला बीडमधील तहसील कार्यालयातून प्रमाणपत्र देण्यात आली नसल्याची माहिती समोर आलं आहे. या प्रकरणी वाघमोडे याच्याविरोधात गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आली आहे. भिगवण(Bhigwan) पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक विनायक दडस-पाटील यांनी या संदर्भात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पुणे ग्रामीण पोलीस(Pune Rural Police) भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे काम पोलीस उपनिरीक्षक विनायक दडस-पाटील यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. निवड झालेला उमेदवार वाघमोडेने सादर केलेले प्रमाणपत्र बनावट असल्याचा संशय आला होता. त्यानंतर बीड येथील तहसील कार्यालयात पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा बीडमधील तहसील कार्यालयातून वाघमोडेला प्रमाणपत्र देण्यात आले नसल्याचे उघड झाले. त्यानंतर वाघमोडे याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करुन त्याला अटक करण्यात आला पोलीस उपनिरीक्षक भालेराव तपास करत आहेत.

Pune News
Ajit Pawar News : अजितदादा गौतमीच्या कार्यक्रमाला येणार का? ; कार्यकर्त्यांनी धरला आग्रह..

वाघमोडे याने भरती प्रक्रियेत सुशिक्षित बेरोजगार अंशकालीन (पीटीई) प्रमाणपत्र सादर केले होते. भरती प्रक्रियेत मैदानी आणि लेखी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांची गुणवत्ता यादीनुसार निवड करण्यात आली. भरती प्रक्रियेत निवड झालेल्या उमेदवारांच्या कागदपत्रांची पडताळणी करण्याचे काम पोलिस उपनिरीक्षक दडस यांच्याकडे सोपविले आहे. निवड झालेला उमेदवार वाघमोडेने सादर केलेले प्रमाणपत्र बनावट(Bogus Certificate) असल्याचा संशय आला होता.

त्यानंतर बीड येथील तहसील कार्यालयात पोलिसांनी चौकशी केली. तेव्हा बीडमधील तहसील कार्यालयातून वाघमोडेला प्रमाणपत्र दिले नसल्याचे उघड झाले. त्यानंतर वाघमोडेविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली.

(Edited By Deepak Kulkarni)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com