Pune news : पुण्यात विचित्र अपघात; तब्बल 48 वाहने एकमेकांना धडकली

Pune news : अपघातात जखमी झालेल्या नागरिकांना जवळच्या रुग्णाल्यात दाखल करण्यात आले आहे
Pune news
Pune newsSarkarnama

Pune news : पुण्यातील (Pune) नवले पूल येथे अपघाताची मालिका अद्यापही सुरू आहे. आज (ता. २०) पुन्हा कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. यात सुमारे ४० ते ४८ गाड्या एकमेकावर आदळल्या आणि सुमारे 40 ते 50 जण जखमी झाल्याची प्राथमीक माहिती मिळत आहे.

अपघातात जखमी झालेल्यांवर जवळच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जात असलेल्या कंटेनरचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे त्यावरील नियंत्रण सुटले. त्यामुळे कंटेनर पंचवीस ते तीस गाड्यांना उडवत वाडगाव पुलाजवळ जाऊन आदळला. यात सुमारे ४० ते ५० जण जखमी झाल्याची माहिती मिळत आहे.

Pune news
Uddhav Thackeray : ...तर प्रकाशजी आपल्याला आजोबांचं नाव घेण्याचा अधिकार नाही!

जखमींना खाजगी रुग्णालयात उपचार सुरू केले आहे. अपघातस्थळी (accident) सिंहगड तसेच दत्तवाडी पोलिस ठाण्याचे अधिकारी उपस्थित झाले आहेत. सुमारे 12 ते 15 रुग्णवाहिका देखील अपघातस्थळी दाखल झाल्या आहेत. अपघात इतका भीषण होता ४० ते ४८ गाड्या एकमेकांवर आदळल्या.

Pune news
ठाकरेंकडे १५-१६च आमदार; संधी मिळाली तर शिवसेना सोडणार का? कायदेंनी स्पष्टच सांगितले

साताऱ्याहून मुंबईच्या दिशेने जाताना सुमारे दोन ते तीन किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. परिणामी माहामार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. पोलिसांकडून (Police) युद्धपातळीवर बचावकार्य आणि महामार्गावरुन वाहने बाजूला करण्याचे काम सुरु आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक,ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama
www.sarkarnama.in