यंत्रणांचा वापर करुन कोणाचे राजकीय जीवन संपवता येत नाही! अजित पवारांच्या कानपिचक्या

राज्यातील आरोप-प्रत्योरोपाच्या राजकारणावरुन अजित पवार (Ajit Pawar) यांनी टोचले सत्ताधारी आणि विरोधकांचे कान
Ajit Pawar
Ajit Pawarsarkarnama

पुणे : राजकारणामध्ये आकस ठेवला नाही पाहिजे. आपल्या हातामध्ये असलेल्या यंत्रणाचा राजकीय स्वार्थासाठी गैरवापर करुन कोणाचेही राजकीय जीवन संपवता कामा नये. राज्यामध्ये आज दोन्ही बाजूंचे चुकत आहे, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी राज्यातील आरोप-प्रत्यारोपांच्या राजकारणावर नेत्यांना कानपिचक्या दिल्या.

खराडी-वडगाव शेरी ऑक्सीसन पार्क उद्यानाचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. या वेळी, राज्याच्या पर्यावरण राज्यमंत्री आदिती तटकरे (Aditi Tatkare), राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar), आमदार सुनील टिंगरे (Sunil Tingre), राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप (Prashant Jagtap) आदी मान्यवर उपस्थित होते.

Ajit Pawar
नानांची दिलदारी : चिमुकलीसाठी हेलिकॉप्टर देत स्वतः रेल्वेने मुंबईला परतण्याचा निर्णय!

या वेळी पवार म्हणाले, आजकाल कोण काय म्हणतो, आपण ज्याच्याबद्दल बोलतो त्यांच्याबद्दल बोलण्याची आपली योग्यता तरी आहे का हेही पाहिले जाहिजे, असा टोला त्यांनी लगावला. टाळी एका हाताने वाजत नाही. दोन्ही बाजूच्या चूका आहेत. ही गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. लोकांना हे राजकारण आवडत नाही. लोक विकासाबाबत आपल्याला कोण मदत करेल हे पाहतात. विचार करण्याची पद्धत बदलावी लागेल. मनुष्य विकास, शिक्षण क्षेत्र, ईनोव्हेशन, रोजगार निर्मितीकडे लक्ष द्यावे लागले, असेही पवार यांनी सांगितले.

यावेळी पवार यांनी महापालिका निवडणुकीवरही भाष्य केले. ते म्हणाले, महापालिकेच्या निवडणुका जाहीर होणार होत्या. मात्र, ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काच्या जागा मिळत नव्हत्या. त्यामुळे अधिवेशनामध्ये कायदा पास केला आहे. उच्च न्यायालयाने आणि सर्वोच्च न्यायालयाने वेगळा निर्णय दिला तर तो त्यांचा अधिकार आहे. ओबीसींचा डाटा गोळा करण्यासाठी आयोग नेमला आहे. तीन महिन्यांत डाटा गोळा करणार आहे. कोणीही जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करुन नये, असेही पवार म्हणाले.

Ajit Pawar
फडणवीसांना हात लावला तर नोटीसप्रमाणे महाविकास आघाडीलाही आग लावू...

दोनचा प्रभाग होणार अशी अफवा पसरवण्यात आली होती. मात्र, मला जी माहिती आहे. त्यामध्ये तीनचाच प्रभाग राहणार आहे, असेही पवार यांनी स्पष्ट केले. २३ गावांच्या समावेशानंतर पुणे हे मुंबईपेक्षा मोठे शहर झाले आहे, असेही पवार यांनी सांगितले. पिंपरी-चिंचवडचा विकास केला. मागच्या निवडणुकीत पराभव स्वीकारावा लागला. आम्ही विरोधी पक्षाची भूमिका निभावली. त्यामुळे लोकांनी आशीर्वाद यावा, असेही पवार म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com