भुजबळ म्हणाले; राज्यपालांना निमंत्रण देण्यास आमच्याकडूनच उशीर झाला

पुणे विद्यापीठाच्या (Pune University) मुख्य इमारतीसमोर सावित्रीबाईंचा पुतळा उभारण्यात आला आहे.
छगन भुजबळ

छगन भुजबळ

सरकारनामा

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील (SPPV) सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी राज्यपालांना निमंत्रण देण्यास आमच्याकडूनच उशीर झाला.त्यात राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी (Bhagatsinh Koshyari) यांच्या कार्यालयाचा दोष नाही.काम वेळेत पूर्ण होईल की नाही याची शाश्‍वती नव्हती.त्यामुळे आमच्याकडून राज्यपालांना उशीरा निमंत्रण पाठविण्यात आले.तोपर्यंत राज्यपालांचे इतर कार्यक्रम ठरले होते.सावित्रीबाईंच्या पुतळ्याचे अनावरण आता ९ जानेवारीला करण्यात येईल, असे अन्न व नागरी पुरवठा मंत्री तसेच समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ (Chagan Bhujbal) यांनी आज सांगितले.

<div class="paragraphs"><p>छगन भुजबळ</p></div>
पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’ प्रदेश भाजपा घरा-घरात पोचवणार

पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोर सावित्रीबाईंचा पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याच्या अनावरणाचा कार्यक्रम सावित्रीबाईंच्या आजच्या जयंतीदिनी आज करण्यात येणार होते.मात्र, राज्यपालांची वेळ न मिळाल्याने विद्यापीठाने हा कार्यक्रम रद्द केल्याची उलट सुलट चर्चा सुरू झाली. या पाश्‍र्वभूमीवर मंत्री भुजबळ यांनीच खुलासा केल्याने वस्तुस्थिती समोर आली आहे.

<div class="paragraphs"><p>छगन भुजबळ</p></div>
दोन वर्षांनंतर राजकीय आखाड्यात उतरलेल्या पाचर्णेंनी उभे केले पवारांपुढे कडवे आव्हान

या संदर्भात बोलताना भुजबळ म्हणाले, ‘‘ पुतळ्याचे काम पूर्ण होईल की नाही याची शाश्‍वती नव्हती. त्यामुळे राज्यपाल कार्यालयास एक महिना आधी कळविणे शक्य नव्हते. राज्यपालांना निमंत्रण दिले आणि काम पूर्ण झाले नाहीतर अडचण होईल म्हणून आधी वळेत निमंत्रण देता आले नव्हते.आता आणखी आठ दिवस मिळाले आहे. या काळात उर्वरित किरकोळ काम पूर्ण करून नऊ जानेवारीला राज्यपाल भगतसिंह कोश्‍यारी यांच्या हस्ते पुतळ्याचे अनावरण करण्यात येईल.’’

सावित्रीबाईंच्या पुतळा अनावरण कार्यक्रमाला राज्यपालांनी वेळ दिला नाही, अशी चर्चा काही राजकीय पक्षांकडून सुरू करण्यात आली. विद्यापीठ वर्तुळातदेखील याची चर्चा सुरू झाली. या पाश्‍र्वभूमीवर भुजबळ यांनी दिलेल्या स्पष्टीकरणामुळे या प्रकरणात कोणतेही राजकारण नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

अन्न व नगारी पुरवठा मंत्री तसेच समता परिषदेचे अध्यक्ष छगन भुजबळ पुणे विद्यापीठात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा बसविण्याचे जाहीर केल्यानंतर तातडीने या कामाला सुरवात झाली. विद्यापीठात जागा निश्‍चिती केल्यानंतर प्रत्यक्ष काम सुरू झाले. मात्र, वेळ कमी मिळाल्याने काम पूर्ण होण्यास काहीसा वेळ लागला. त्यामुळे आज या पुतळ्याचे अनावरण होऊ शकले नाही.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com