बीएचआर प्रकरण : संशयित आमदार पटेल सापडेनात  - BHR case: Suspected MLA Patel not found | Politics Marathi News - Sarkarnama

ब्रेकिंग न्यूज

शरद पवार आज अमित शहांच्या भेटीला, शहांकडे सहकार खात्याचा कारभार आल्यानंतरची पहिलीच भेट

बीएचआर प्रकरण : संशयित आमदार पटेल सापडेनात 

सरकारनामा ब्यूरो
गुरुवार, 8 जुलै 2021

बीएचआर प्रकरणात जळगावमधील भाजपचे विधान परिषदेचे आमदार चंदुलाल पटेल  यांचे नाव  संशयित आरोपी म्हणून पुढे आले आहे.

पुणे : भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटीव्ह सोसायटीतील (बीएचआर) आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात जळगावमधील भाजपचे विधान परिषदेचे आमदार चंदुलाल पटेल (chandulal patel) यांचे नाव संशयित आरोपी म्हणून पुढे आले आहे.गेल्या महिन्यात त्यांच्याविरुद्ध अटक वॉरंट निघाले होते. तेव्हापासून ते फरार आहेत.(BHR case: Suspected MLA Patel not found)

या प्रकरणात पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने जळगाव शहर, जामनेर, भुसावळ औरंगाबाद, धुळे, मुंबई, अकोला आणि पुणे या सहा जिल्ह्यात ऐकाचवेळी छापेमारी करत तब्बल बारा जणांना अटक केली होती. त्यावेळीच पटेल यांच्याविरोधात अटक वारँट काढण्यात आले होते. गेल्या महिन्यात करण्यात आलेल्या कावार्इत सराफ व हॉटेल व्यावसायिक भागवत भंगाळे, दालमिल असोसिएशनचे अध्यक्ष प्रेम नारायण कोगटा, संजय तोतला, जयश्री शैलेश मणियार (सर्व रा. जळगाव), जितेंद्र रमेश पाटील, कापूस व्यापारी राजेश लोढा (रा.जामनेर), जामनेर पंचायत समितीचे माजी सभापती व नगरसेवक छगन झाल्टे, भुसावळचे माजी उपनगराध्यक्ष आसिफ मुन्ना तेली (रा. भुसावळ), प्रीतेश चंपालाल जैन (रा.धुळे), अंबादास आबाजी मानकामे (रा.औरंगाबाद), जयश्री अंतिम तोतला (रा. मुंबई) व प्रमोद किसनराव कापसे (रा.अकोला) या १२ जणांना अटक झाली होती. त्यातच आमदार चंदुलाल पटेल यांच्याविरोधात देखील अटक वारँट निघाले होते. त्यानंतर या प्रकरणातील मुख्य आरोपी जितेंद्र खंदारेला यांना देखील नुकतीच अटक करण्यात आली आहे.

बीएचआर प्रकरणी पुणे पोलिसांनी एकावेळी जळगाव, औरंगाबाद, पुणे, धुळे अशा सहा जिल्ह्यात छापे टाकून बारा जणांना अटक केली होती. गेल्या महिन्यात झालेल्या कारवाईत चंदुलाल पटेल यांच्या विरोधातही अटक वॉरंट निघाले होते. ते फरार असून त्यांचा शोध सुरू आहे, असे अर्थिक गुन्हे शाखेच्या उपायुक्त भाग्यश्री नवटके यांनी सांगितले.
Edited By : Umesh Ghongade

अधिक राजकीय बातम्यांसाठी सरकारनामा अॅप डाऊनलोड करा
Play Store    App Store

संबंधित लेख