भोसरीच्या पैलवान आमदारांनी गोव्यातील कुस्ती जिंकली...

म्हापशातून भाजपचे (BJP) उमेदवार जोशुआ डिसोझा विजयी झाल्यावर भाजप आमदार लांडगेंनी गोव्याचे मैदान मारले, अशी चर्चा भोसरीसह पिंपरी-चिंचवडमध्ये रंगली आहे.
Mahesh Landge.jpg
Mahesh Landge.jpgSarkarnama

पिंपरी : गोव्याच्या टीम फडणवीसमध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे (Mahesh landge) यांचा समावेश होता. ते म्हापसा मतदारसंघाचे प्रभारी होते. पक्षाने टाकलेला विश्वास दिलेली जबाबदारी सार्थ ठरविणार असल्याचे त्यांनी १५ जानेवारी रोजी या 'सरकारनामा'ला गोवा येथून बोलताना सांगितले होते. हा विश्वास आणि जबाबदारी त्यांनी सार्थ ठरवली. गोवा विधानसभा निवडणुकीच्या गुरुवारी (ता.१० मार्च) झालेल्या मतमोजणीत म्हापशातून भाजपचे (BJP) उमेदवार जोशुआ डिसोझा विजयी झाले. त्यानंतर पैलवान लांडगेंनी गोव्याचे मैदान मारले, अशी चर्चा भोसरीसह पिंपरी-चिंचवडमध्ये रंगली आहे.

Mahesh Landge.jpg
पाचही राज्यातील पराभवानंतर राहुल गांधींचे भावुक टि्वट

‘टीमवर्क’ला यश मिळाले. गोव्यात पुन्हा एकदा भाजपाचे सरकार स्थापन होत असताना त्यात माझा खारीचा वाटा राहील, याचे मनोमन समाधान आहे, अशी प्रतिक्रिया लांडगेंनी म्हापशासह गोव्यातील पक्षाच्या विजयावर दिली. गोव्यासह उत्तरप्रदेश, मणिपूर आणि उत्तराखंड अशा चार राज्यांत भाजप सत्तेवर येणार आहे. त्यावर बोलताना लांडगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या ‘व्हीजन ऑफ डेव्हलपमेंट’ संकल्पनेला जनतेने ही साथ दिल्याचे सांगितले. विकासाचे मुद्दे घेवून मोदी काम करीत आहेत. त्याला सामान्य नागरिकांची साथ मिळत आहेत. लोकांना विकास आणि विश्वास हवा आहे. पक्ष धोरणानुसार आश्वासक विकास हाच निवडणुकांचा मुद्दा आहे. पक्ष कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांच्या एकत्रित प्रयत्नातून देश भाजपामय होतोय, याचे समाधान वाटते, असे लांडगे म्हणाले.

Mahesh Landge.jpg
गोव्याच्या CM सावंतांना शनिदेव पावला : उपमुख्यमंत्री आजगावकरांच्या मागे साडेसाती

म्हापशाच्या निकालाकडे सगळ्या गोव्याचे लक्ष लागले होते. कारण तेथून माजी उपमुख्यमंत्री आणि भाजपाचे दिवंगत नेते फ्रान्सिस डिसुझा यांचे पुत्र जोशुआ डिसुझा हे निवडणूक लढवत होते. तर, त्यांच्या विजयाची जबाबदारी लांडगेंकडे होती. २०१९ साली फ्रान्सिस डिसुझा यांच्या निधनानंतर झालेल्या पोटनिवडणुकीत जोशुआ विजयी झाले होते. तर, यावेळी जोशुआ डिसुझा विरुद्ध सर्वपक्षीय नेते एकवटले होते. जोशुआ तरुण असून त्यांचे वय ३३ वर्षे आहे. भाजपातून बंडखोरी केलेले मंत्री मायकेल लोबो यांनी म्हापशात विशेष लक्ष घातले होते. तरीही चुरशीच्या या लढाईत जोशुआ यांनी अखेर बाजी मारली आहे.

Mahesh Landge.jpg
भगवंतसिंग मान घेणार शहीद भगतसिंग यांच्या जन्मभूमीत मुख्यमंत्रीपदाची शपथ

चार राज्यातील पक्षाचा विजय पिंपरी-चिंचवड भाजपने आपल्या शहर पक्ष कार्यालयाबाहेर पेढे वाटून आज साजरा केला. गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाल्याने तेथील विजयाची पुनरावृत्ती पिंपरी-चिंचवडमध्ये होईल, भाजप पुन्हा महापालिका निवड़णुकीत बहूमत मिळवेल, असा विश्वास महापौर माई ढोरे यांनी या आनंदोत्सवप्रसंगी व्यक्त केला. यावेळी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, प्रदेश सचिव अमित गोरखे, स्थायी समिती सभापती अॅड. नितीन लांडगे, नगरसेविका अनुराधा गोरखे, संघटन सरचिटणीस अमोल थोरात, सरचिटणीस मोरेश्वर शेडगे, राजू दुर्गे, विजय फुगे आदी उपस्थित होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com