Karnataka Assembly Elections : निवडणूक कर्नाटकची, मतदान करणार तीन हजार भोसरीकर

Karnataka Assembly Elections : नऊ मतदारसंघात मराठी मते निर्णायकी आहेत.
Karnataka Assembly Election 2023
Karnataka Assembly Election 2023 Sarkarnama

BJP MLA Mahesh Landge Karnataka Assembly Elections : कर्नाटक विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार शेवटच्या टप्यात ऐन रंगात आला आहे.दरम्यान,त्याकरिता महाराष्ट्रातील भाजप आणि दोन्ही कॉंग्रेसचे मोठे नेते सीमाभागातील प्रचारात उतरले आहेत. बुधवारी (ता.१०) ही निवडणूक होत असून निकाल ता. १३ मे रोजी आहे.

कर्नाटकातील भाजपची राजवट घालवून आपली सत्ता आणण्याचा कॉंग्रेसने चंग बांधला आहे. सीमा भागातील मराठी मतदारांची मते वळविण्यासाठी महाराष्ट्रातील मोठे नेते प्रचारात उतरले आहेत. सत्ता पुन्हा कायम राखण्यासाठी भाजपनेही महाराष्ट्रातील आपल्या मराठी नेत्यांची फौज सीमाभागात उतरवली आहे. तेथील नऊ मतदारसंघात मराठी मते निर्णायकी आहेत.

त्यामुळे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सध्या कर्नाटकात निपाणी,बेळगाव, खानापूर या सीमाभागात तळ ठोकून आहेत. त्यांच्या मदतीला पिंपरी-चिंचवडमधील त्यांचे कट्टर समर्थक भोसरीचे आमदार महेश लांडगे हे आहेत.

Karnataka Assembly Election 2023
Pimpri Chinchwad BJP news : भाजपची राज्य कार्यकारिणी तयार करताना जिल्हाध्यक्षांना विचारलेच नाही ? ; दोघांच्या भांडणात..

त्यांची तरुणाईत क्रेझ असल्याने त्यांची मते आकर्षित करण्याची जबाबदारी त्यांच्यावर फडणवीसांनी दिलेली आहे. यापूर्वीही महेश लांडगे गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी गेले होते. तर, कोल्हापूर पोटनिवडणुकीतही तेथील पैलवानांची मते खेचण्यासाठी हे भोसरीचे पैलवान आमदार तिकडे प्रचारात उतरले होते.

दरम्यान, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे उद्या पक्ष संघटनेच्या कामासाठी पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर असल्याने आमदार लांडगे हे आज पुन्हा परत फिरले आहेत.शहरातील बूथ कमिटी मिटींग व इतर दोन प्रदेशाध्यक्षांचे कार्यक्रम करून ते पुन्हा कर्नाटकच्या प्रचाराला जाणार आहेत. कारण त्याची सांगता पक्षाचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सभेने सोमवारी होणार आहे.

Karnataka Assembly Election 2023
NCP News : BJP मध्ये जाण्याचा विचार करणारे NCP मध्ये असू शकतात..; जयंत पाटलांचा रोख नेमका कुणाकडे ?

भोसरीकर करणार मतदान

कर्नाटकच्या निवडणुकीत तीन हजार सीमाभागातील मतदार हे भोसरीकर आहेत. त्यांना मतदानासाठी आरामबसने नेण्याची सोय लांडगे यांनी केली आहे. दहा तारखेच्या मतदानासाठी या मतदारांना ९ तारखेच्या रात्रीच तिकडे नेले जाणार आहे. त्याचे नियोजन करण्यासाठी लांडगेची भोसरीतील एक टीम तिकडे गेली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com